किने/वार्ताहर
सिरसंगी येथे मुकुंद देसाई यांच्या शेतातील विहिरीत गवा पडला. रात्रीच्या सुमारास पाणी पिण्यासाठी आला असताना विहिरीतील गाळात गवा अडकून बसला. जंगलाच्या हद्दीलगत असणाऱ्या काळवाट शेतातील विहिरीतील पाणी सोडण्यासाठी मुकुंद देसाई हे विहिरिकडे गेले असता गवा विहिरीत पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
देसाई यांनी याबाबत वन विभागाला कळवले. गवा विहिरीत पडल्याचे कळताच बघ्यांची गर्दी केल्याने गवा अधिकच बिथरला. गव्याला बाहेर कडण्यासाठी विहिरीत पाणी सोडण्यात आले असून त्याचबरोबर जेसीबीच्या सहाय्याने त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









