प्रत्येक मंडळावर लक्ष ; गस्ती पथके तैनात; महाद्वार रोडवर नो एन्ट्री
प्रतिनिधी/कोल्हापूर
अनंत चतुर्दशीनिमित्त उद्या, मंगळवारी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मोठ्या मंडळांच्या श्री मूर्तीचे विसर्जन होणार आहे. कोविड-१९ च्या पार्श्वमूमीवर प्रशासनाने मंडळांना अनेक निर्बंध घातले आहेत. मिरवणूक, जल्लोष आणि कोणत्याही प्रकारचे वाद्य वाजवण्यास मनाई केली आहे. विसर्जन शांततेत पार पडावे यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे. सोमवारी रात्रीपासूनच गस्ती पथके फिरणार आहेत. यासाठी अधिकारी व कर्मचारी असा तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त नेमला आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. दररोज पाचशे ते सहाशे नवे रुग्ण सापडत आहेत. शासकीय व खासगी रुग्णालयांत बेड शिल्लक नसल्याने बाधित रुग्णांवर घरीच उपचार करण्याची वेळ येत आहेत. व्हेंटिलेटर मिळत नसल्याने रुग्णांना जीव गमवावा लागत आहे. अशा बिकट परिस्थितीत मंडळांनी साध्या पध्दतीने यंदा गणेशोत्सव साजरा करून प्रशासनाला सहकार्य केले आहे.
कोणत्याही प्रकारचा जल्लोष न करता व मिरवणूक न काढता यंदा गणेश मूर्ती विसर्जन कराव्यात जेणे करून लोकांची गर्दी होणार नाही. तरच कोरोनाचा अटकाव करणे शक्य होणार आहे. त्यामुळे प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, वादावादी अथवा हाणामारी होऊ नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त नेमला आहे. सकाळी आठ वाजल्यापासून शेवटच्या गणपतीचे विसर्जन होईपर्यंत खडा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
महाद्वार रोडवर नो एन्ट्री
यंदा गणेश मूर्ती पंचगंगा नदीत विसर्जित केल्या जाणार नाहीत. त्यामुळे विसर्जनासाठी येणारे गणपती महाद्वार रोडवर येणार नाही. थेट इराणी खणीकडे जाणार आहेत. मंडळांना महाद्वार रोडवर नो एन्ट्री केली आहे. पोलीस प्रशासनाने हा निर्णय जाहीर केला आहे. निरोपाचे नारळ देणारे मंडपही उभारले जाणार नाहीत.
असा आहे बंदोबस्त
पोलीस अधीक्षक – १
अप्पर पोलीस अधीक्षक- २
उपविभागीय पोलीस अधिकारी – ५
पोलीस निरीक्षक- १२०
पोलीस कर्मचारी – २०००
आरसीपी प्लाटून- ३
क्यूआर टी टीम – ४
एसआरपीएफ कंपनी -१
होमगार्ड जवान -७००
बॉम्बशोधक पथक –
Previous Articleते सर्वाही सदा सज्जन। सोयरे होतु
Next Article केंद्र-राज्य संबंधात तणाव









