इचलकरंजी / प्रतिनिधी:
येथील सामाजिक कार्यकर्त्यां नरेश भोरे आत्मदहन प्रकरणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी, माजी मुख्याधिकारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका विभागाच्या कार्यासन अकराचे प्रमुख, आराध्या एंटरप्राइजेस या स्वच्छता ठेका असणाऱ्या कंपनीचे ठेकेदार, नगरपालिकेचे माजी सभापती, नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी, नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक, ठेकेदार आणि घंटागाडीचा चालक अशा सहा जणांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झालेल्यामध्ये नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर, माजी मुख्याधिकारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका विभागाच्या कार्यासन अकराचे सध्याचे प्रमुख दीपक पाटील, आराध्या एंटरप्राइजेस या स्वच्छता ठेका असणाऱ्या कंपनीचे ठेकेदार नगरपालिकेचे माजी सभापती मारुती पाथरवट, नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार, नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक मिसाळ, ठेकेदार, घंटागाडीचा चालक अमर लाखे या सहा जणाचा समावेश आहे. हा गुन्हा मंगळवारी पहाटेच्या सुमारास येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. या सर्वांवर भा.द.वि. ३०६ (३४) प्रमाणे सामाजिक कार्यकर्ता भोरेना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याविषयी
गुन्हा दाखल झाला आहे. अशी माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी दिली.
सामाजिक कार्यकर्ता भोरे याच्या मृत्यूप्रकरणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी, माजी मुख्याधिकारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका विभागाच्या कार्यासन अकराचे प्रमुख, आराध्या एंटरप्राइजेस या स्वच्छता ठेका असणाऱ्या कंपनीचे ठेकेदार, नगरपालिकेचे माजी सभापती, नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी, नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक, ठेकेदार आणि घंटागाडीचा चालक अशा सहा जणा विरोधी कारवाई करावी, या मागणीसाठी सोमवारी मध्यरात्री पर्यत शेकडो त्यांचे मित्र मंडळी, नातेवाइकांनी नगरपालिकेत भोरेचा पार्थिव ठेवून, ठिय्या आंदोलन सुरु केले होते. तसेच संबंधीत सहा जणाविरोधी कारवाई होत नाही तोपर्यत मृतदेह हलवणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली होती . त्यामुळे पालिकेच्या परिसरात तणाव .. करण्यात आल्यानंतर भोरेच्या पार्थिव पालिकेतून हलवून अंत्यसंस्कार करण्यात आले.
Previous Articleसातारा : यवतेश्वर घाटात अपघात, युवक ठार
Next Article ऑक्टोबरमध्ये जीएसटी संकलन वाढण्याची आशा









