पत्नी सोडून गेल्याच्या नैराशातून केले कृत्य
प्रतिनिधी / वारणानगर
क॥ सातवे ता. पन्हाळा येथील माजी सरपंच पै. गणेश यशवंत हांडे वय ४५ यांनी राहत्या घरी तूळईला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली असून पत्नी सोडून गेल्याच्या नैराशेंतून त्यानी आत्महत्येचे कृत्य केल्याचे पोलीस तपासात नोंदवले आहे.
पै. गणेश यांचा भाऊ दिपक हांडे यानी कोडोली पोलीसात याबाबत वर्दी दिलेवर घटनेची नोंद पोलीसात झाली असून गणेश यांची पत्नी गेली तीन वर्षापासून नांदावयास नाही याच नैराश्यातून त्यांनी आज रविवार दि. ५ रोजी आत्महत्या केली. सकाळी ११ वाजले तरी दरवाजा उघडला नसल्याने घरातील लोक हाका मारू लागले कोणताच प्रतिसाद न आल्याने दार उघडल्यावर पै. गणेश यांनी तुळईला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केलेचे निदर्शनास आले. त्यांच्यामागे दोन मुले, विवाहित भाऊ असा परिवार आहे.
पै. गणेश हांडे हे तात्यासाहेब कोरे कुस्ती प्रशिक्षण केंद्रातील नामवंत मल्ल होते बारणेत भरणाऱ्या आतंरराष्ट्रीय कुस्ती मैदानात तसेच जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर अनेक कुस्ती मैदानात त्यांनी कुस्तीत विजय मिळवत नाव कमावले होते सातवेतील राजकीय सामाजिक क्षेत्रात त्यांचा सक्रीय सहभाग होता आ. विनय कोरे यांचे ते विश्वासू कार्यकर्ते म्हणून परिचीत होते यातूनच सातवे गावचे सरपंच म्हणून त्यांनी काही वर्ष धुरा सांभाळली होती त्यामुळे पै. गणेश यांच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.









