वार्ताहर / कबनूर
साजने तालुका हातकणंगले येथील 58 वर्षाच्या एका एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्यावर येथे उपचार सुरू आहेत. गावात चिंतेचे वातावरण पसरले आहे.या व्यक्तीला सर्दी, खोकला व श्वसनाचा त्रास होत होता. चार दिवसापूर्वी उपचारासाठी इचलकरंजी येथील आयजीएम दाखल करण्यात आले होते.
आज संध्याकाळी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर ग्रामपंचायतीने ते रहात असलेला परिसर सील करण्यात आला. त्यांच्या संपर्कातील घरच्या चौघांना अतिग्रे येथील संजयघोडावत इन्स्टिट्यूट वर संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. ग्रामस्थांनी घाबरून न जाता मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतर ठेवून नियमांचे पालन करावे असे आवाहन ग्रामपंचायत व कोरोना आपत्ती व्यवस्थापन समिती तर्फे करण्यात आले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








