दोघांविरोधात करवीर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
वार्ताहर/सांगरूळ
सांगरूळ (ता. करवीर) येथील सर्वोदय ग्रामीण व्यापारी बिगर शेती पतसंस्थेत १० लाख ९८ हजाराचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन सचिवासह दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. १ एप्रिल २००६ ते ३१ मार्च २०१९ च्या लेखा परीक्षणात हा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबतची फिर्याद लेखापरीक्षक अशोक बाबुराव बिरांजे (वय ५२) यांनी करवीर पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे .
गुन्हा दाखल झालेल्या संशयितामध्ये तत्कालीन सचिव लक्ष्मण पाटील (पासार्डे ) व बजरंग बाबू धोत्रे (सांगरूळ ) यांचा समावेश आहे. सर्वोदय पतसंस्थेचे लेखापरीक्षण लेखापरीक्षक अशोक बिरंजे यांनी केले यात त्यांनी २००६ ते २०१९ या काळात तत्कालीन सचिव लक्ष्मण दौलू पाटील यांनी पदाचा गैरवापर करून ७ लाख ९५ हजार १५० रुपयांचा अपहार केला. तसेच बजरंग धोत्रे यांनी २००६ ते २०१८ अखेर आर्थिक पत्रात फेरफार करून तीन लाख तीन हजार दोनशे पन्नास रुपयांचा अपहार केल्याचा ठपका ठेवला आहे. त्यानुसार दोघांनी एकूण १० लाख ९८ हजाराचा अपहार केल्याची फिर्याद लेखापरीक्षक बिरंजे यांनी दिली. त्यानुसार दोघा संशयितावर करवीर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे .
Previous Articleकोल्हापुरात आज तीन कोरोना पॉझिटिव्ह
Next Article दहावीच्या विद्यार्थ्याला कोरोनाची लागण








