452 पॉझिटिव्ह : 264 जण कोरोनामुक्त
कोल्हापूर / प्रतिनिधी
जिल्हय़ात मंगळवारी सायंकाळपर्यत कोरोनाने 21 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना बळींची संख्या 323 वर पोहोचली आहे. कोरोना बळींमध्ये कोल्हापूर शहरातील 7 तर इचलकरंजी आणि परिसरातील 10 जणांचा समावेश आहे. सायंकाळपर्यत 452 नवे कोरोना रूग्ण दिसून आले. त्यामुळे आजपर्यत पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 11 हजार 513 झाली आहे. तसेच 264 जणांना डिसचार्ज मिळाल्याने कोरोनामुक्तांची संख्या 4,867 झाली आहे.
जिल्हय़ात मंगळवारी सायंकाळपर्यत कोरोनाने 21 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये इचलकरंजीतील आयजीएम हॉस्पिटलमध्ये इचलकरंजीतील नेहरूनगर येथील 33 वर्षीय तरूण, सांगली नाका येथील 88 वर्षीय वृद्ध, सांगली रोड येथील 40 वर्षीय महिला, गांधी कॅम्प येथील 82 वर्षीय वृद्ध, भाग्यश्री कॉलनी येथील 60 वर्षीय वृद्ध, हातकणंगले तालुक्यातील रूई येथील 65 वर्षीय वृद्ध, शिरोळ तालुक्यातील कुरूंदवाड येथील 60 वर्षीय वृद्ध, शिरढोण येथील 75 वर्षीय वृद्ध, टाकवडे येथील 55 वर्षीय पुरूष, शिरोळ येथील 50 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
येथील सीपीआर हॉस्पिटलमध्ये शिरोळ तालुक्यातील शिरटी येथील 50 वर्षीय पुरूष, करवीर तालुक्यातील वाकरे येथील 55 वर्षीय पुरूष, शाहूवाडी तालुक्यातील अनोरे येथील 35 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. करवीर तालुक्यातील चिंचवाड येथील 85 वर्षीय वृद्धाचा खासगी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.
कोल्हापूर शहरातील संभाजीनगर येथील 82 वर्षाचा वृद्ध, कनाननगर येथील 50 वर्षीय पुरूषाचा सीपीआरमध्ये मृत्यू झाला तर दौलतनगर येथील 60 वर्षीय वृद्धा, जवाहरनगर चौकातील 76 वर्षीय पुरूष, शिवाजी पेठेतील 87 वर्षीय पुरूष, मंगळवार पेठेतील 62 वर्षीय पुरूष, शाहूपुरी सहाव्या गल्लीतील 72 वर्षीय पुरूष आणि साकोली कॉर्नर येथील 65 वर्षीय महिलेचा कोरोनाने खासगी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. मृतांत कोल्हापूर शहरातील 8, हातकणंगले तालुक्यातील 7, शिरोळ तालुक्यातील 4 आणि करवीर तालुक्यातील दोघांचा समावेश आहे. आजपर्यत कोरोना बळींची संख्या 323 झाली आहे.
कोल्हापूर शहरात सायंकाळपर्यत 205 नवे रूग्ण मिळून आले. जिल्हय़ात परदेशातून आलेले 3 आणि जिल्हय़ातील 2 हजार 304 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 1 हजार 535 जणांचे स्वॅब घेण्यात आले. तसेच 6 हजार 323 जणांवर उपचार सुरू आहेत.
आजअखेर 4867 जणांना डिस्चार्ज ः डॉ. बी. सी. केम्पीपाटील
मंगळवारी सायंकाळपर्यंत आरटीपीसीआर, सीबीएनएएटी चाचणीचे 1 हजार 677 अहवाल मिळाले. त्यापैकी 1 हजार 253 निगेटिव्ह तर 312 पॉझिटिव्ह आहेत. तसेच 107 प्रलंबित आणि 4 नाकारले आहेत. ऍन्टीजेन टेस्टिंगचे 316 अहवाल आले. त्यापैकी 212 निगेटिव्ह तर 104 पॉझिटिव्ह आहेत. खासगी लॅबमधील 36 पॉझिटिव्ह आल्याने 452 नवे रूग्ण झाले आहेत. आजअखेर 11 हजार 513 पॉझिटिव्हपैकी 4867 जणांना डिस्चार्ज दिला आहे. आजअखेर जिह्यात 6323 पाŸिझटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील यांनी दिली.
सायंकाळपर्यत मिळालेल्या 452 पॉझिटिव्ह रूग्णांत गडहिंग्लज 2, हातकणंगले 55, कागल 18, करवीर 50, पन्हाळा 17, राधानगरी 6, शाहूवाडी 3, शिरोळ 23, नगर पालिका क्षेत्र 72, महापालिका क्षेत्र 205 व इतर 1 समावेश आहे. आजअखेर तालुका, नगरपालिका आणि महापालिका क्षेत्रनिहाय रुग्णसंख्या अशी ः आजरा 219, भुदरगड 282, चंदगड 423 गडहिंग्लज 311, गगनबावडा 30, हातकणंगले 1178, कागल 236, करवीर 1243, पन्हाळा 423, राधानगरी 328, शाहूवाडी 349, शिरोळ 473, नगर पालिका क्षेत्र 2,414, कोल्हापूर महापालिका क्षेत्र 3,421 असे 11 हजार 330 आणि इतर 183 मिळून 11 हजार 513 रुग्णसंख्या आहे. 11513 पॉझिटिव्ह रूग्णांपैकी 4867 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला. 323 जणांचा मृत्यू झाल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल रूग्णसंख्या 6323 इतकी असल्याचे डॉ. केम्पीपाटील यांनी सांगितले.
कोल्हापूर ः जिल्हय़ातील एकूण पॉझिटिव्ह रूग्ण ः 11513
जिल्हय़ातील एकूण कोरोनामुक्त ः 4867
उपचार घेत असलेले रूग्ण ः 6323








