भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे यांची टिका
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर २४ ला शाहुंच्या पुतळ्याजवळ उपोषणाला बसणार
प्रतिनिधी / कोल्हापूर
वीज बिल, कर्जमाफी, अवकाळी नुकसान भरपाईवर सरकारने काढलेल्या घोषणांच्या जीआरची अक्षरश: रद्दी झाली तरी सरकारचे डोळे उघडले नाहीत. घरगुती, शेती पंपाचे वीज बिल, कर्जमाफी अवकाळीची नुकसान भरपाई यातील एकाचीही पुर्तता झालेली नाही. याची आठवण करुन देण्यासाठी ऐतिहासिक दसरा चौकातील शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर २४ फेब्रुवारीला लाक्षणिक उपोषण करणार असल्याची माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी पत्रकार परिषदेत केली.
घाटगे म्हणाले, जागतिक महामारी कोरोनाच्या लॉकडाऊन काळात भरमसाठ वाढीव वीज बिले देऊन ग्राहक व सर्वसामान्यांना शासनाने शॉक दिला होता. दिवाळीपूर्वी याबाबत निर्णय घेऊन ग्राहकांना गोड बातमी देऊ. असा शब्द राज्य शासनाने दिला होता. मात्र दिवाळीत गोड बातमी तर राहू दे याउलट ती भरलीच पाहिजेत. असा दंडक काढून जनतेची फसवणूक केली आहे. असा आरोप त्यांनी
प्रोत्साहनात्मक अनुदान केव्हा ?
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढल्यानंतर ५० हजार रुपयाचे प्रोत्साहन अनुदानची ६ मार्च २०२० रोजी घोषणा केली, मात्र अजूनही शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत ते कधी मिळणार असा सवाल समरजीत घाटगे यांनी केला. ते म्हणाले, कर्जमाफीचा लाभा मिळणार या अपेक्षेने शेतकऱ्यांनी दागिने गहान ठेऊन जून पूर्वी पीककर्ज भरले. दोन लाखांवरील कर्ज असलेल्या शेतकऱयांच्या कर्जमाफीचाही अद्याप पत्ता नाही. ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या अवकाळीची मदत तोकडी आहे. ती वाढवून दिली पाहिजे अशी आमची मागणी आहे. गेली तीन महिने शेतकऱयांच्या बांधावर जाऊन प्रश्न समजून घेतल्या. त्यातून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत केला आहे. परंतु सरकारने याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. म्हणून उपोषणाला बसत असल्याचे त्यांनी सांगितले. सकाळी कुटुंबियांसह अंबाबाईचे दर्शन घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याची या सरकारला सुबुद्धी दे ! असे साकडे घालून व राजर्पि छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळी अभिवादन करून या उपोषणाला सुरुवात करणार आहे.
यावेळी माजी आमदार अमल महाडिक, किसान मोर्चाचे भगवान काटे, वीरेंद्र घाटगे, महवीर गाठ, बाबासाहेब पाटील, अशोग चराटी, राजवर्धन निंबाळकर, अजिंक्य इंगवले, राहुल देसाई, नाथाजी पाटील आदी उपस्थित होते.









