टोप/ वार्ताहर
हातकणंगले तालुक्यातील संभापुर येथील ग्रामपंचायतीस आर.आर.पाटील (आबा)सुंदर गाव पुरस्कार याेजना कमिटिने भेट दिली.
कमिटिने संभापुर गावाने केलेल्या विविध कामांची पाहणी केली.
संभापुरचे लाेकनियुक्त सरपंच प्रकाश झिरंगे , ग्रामपंचायत सदस्य यांनी लाेकहभागातुन गावातिल प्राथमिक शाळा, गावतलाव, छत्रपती संभाजी महाराज मंदिर आवार सुशाेभिकरण , गावविहार दुरुस्ती,स्वच्छ पाणी प्रकल्प
आदिची पाहणी कमिटीने केली. व मुल्यांकन केले.हातकणंगले तालुक्यातील १५ गावानी सहभाग नाेंदविला आहे. पाहणीस आलेल्या कमिटीस सरपंच प्रकाश झिरंगे यांनी प्राेजेक्टर द्वारे सविस्तर माहीती दिली.
या कमिटीत कागलचे गटविकास आधिकारी एस.एस.संसारे,सहाय्यक गटविकास आधिकारी आप्पासाहेब माळी, अरविंद पाटील, अमाेल मुंढे, विस्तार आधिकारी नारायण रामाण्णा, संताेष पाेवार सहभागी हाेते. यावेळी माजी सरपंच मारुती भाेसले, उपसरपंच सजेॅराव माेहिते,सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामसेविका आसमा मुल्लाणी यांनी कमिटिस माहिती दिली.
Previous Articleहाथरसमधील ‘त्या’ घटनेचा निषेध
Next Article कोगनोळी येथे आशाराणी पाटील यांचा सत्कार









