प्रतिनिधी / जयसिंगपूर
येथील उद्योजक संजय घोडावत ग्रुपने भारतातील ‘ऑर्गनाईझड् रिटेल’ क्षेत्रात धडाडीचे पाऊल टाकले आहे सोमवार दिनांक. २० सप्टेंबर २०२० रोजी जयसिंगपूर (कोल्हापूर, महाराष्ट्र), स्टेशन रोड येथील ‘स्टार लोकलमार्ट’ या आपल्या रिटेल फ्रेंचायझी मॉडेलचे शानदार उद्घाटन सोहळा संपन्न झाला उच्च-गुणवत्तेची उत्पादने आणि सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रख्यात असलेल्या या समूहाचे हे चौथे स्टोअर असून याआधी मजले, धरणगुत्ती आणि अतिग्रे येथे ‘स्टार लोकलमार्ट’ची भरघोस प्रतिसादात सुरूवात झाली आहे.
कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक सुरक्षेतेच्या बाबींची काळजी घेऊन मोजक्याच लोकांच्या उपस्थित हा उद्घाटन सोहळा पार पडला. नवीन स्टार लोकलमार्ट शॉपचे उद्घाटन प्रख्यात उद्योजक व संजय घोडावत ग्रुपचे अध्यक्ष व संस्थापक संजय घोडावत यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्यास मुख्य कार्यकारी अधिकारी श्रेणीक घोडावत, घोडावत उद्योग समूहाचे वरिष्ठ अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. संजय घोडावत यांच्या हस्ते फीत कापून व नंतर केक कापून स्टार लोकल मार्ट चे उद्घाटन करण्यात आले
‘ऑर्गनाईझड् रिटेल’ क्षेत्रात नवे बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने आणि “आत्मनिभार भारत” या संकल्पनेला अधिक बळकटी देण्याच्या उद्देशाने संजय घोडावत ग्रुपने स्टार लोकलमार्टची सुरूवात केली आहे. स्टार लोकलमार्टच्या माध्यमातून ग्राहकांना उत्तम दर्जाचे दैनंदिन वापरातील अनेक खाद्यपदार्थ रास्त दरात खरेदी करता येणार आहेत.
घोडावत रिटेल एलएलपीच्या बॅनरखाली स्टार लोकलमार्ट अत्यंत अभ्यासपूर्वक रिटेल फ्रेंचायजी मॉडेलची सुरूवात करीत आहे. स्टार लोकलमार्ट ही ‘ऑर्गनाईझड् रिटेल’ क्षेत्रात एक अद्वितीय आणि फायदेशीर व्यवसायाची संधी देणारे व्यासपीठ आहे. विश्वसनीय ब्रँड, उत्तम नफा, उच्च-गुणवत्तेची उत्पादने, तंत्रज्ञान आणि मार्केटिंग, प्रशिक्षण, इत्यादींमुळे हे फ्रेंचायजी मॉडेल अद्वितीय, व्यवहार्य शिवाय फ्रँचायझी मालकास चांगला परतावा मिळवून देणारे उत्तम फ्रेंचायजी मॉडेल ठ रेल असा विश्वास व्यवस्थापनाने केला.
स्थानिकांच्या जीवनात समृद्धी आणेल – संजय घोडावत
“स्टार लोकलमार्टची सुरुवात ही महाराष्ट्रातील लोकांसाठी केवळ अभिमानाची गोष्ट नसून एक महत्तवपूर्ण क्षण आहे. यामुळे आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि स्थानिक लोकांचा सर्वांगीण विकास साधण्यात ही सुरूवात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. हे या भागासाठी ‘समृद्धीचे इंजिन’ म्हणून काम करेल आणि स्थानिकांच्या जीवनात समृद्धी आणेल.”
सर्व इच्छुक उद्योजकांचे स्वागत – श्रेणिक घोडावत
“भारतीय रिटेल उद्योगाची वेगाने भरभराट होत आहे आणि २०२५ पर्यंत एक लाख करोड डॉलर्स इतकी वाढ होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे या क्षेत्रात प्रत्येकाला प्रगतीच्या संधी उपलब्ध होणार आहेत, “या आनंददायी प्रसंगी, मी सर्व इच्छुक उद्योजकांना आपल्या रिटेल फ्रेंचायजी मॉडेलमध्ये सामील होण्यासाठी आणि व्यावसायिक जगतात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी आमंत्रित करू इच्छित आहे.”
घोडावत रिटेल एलएलपी महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे या भागांपासून स्टार लोकलमार्ट स्टोअर्स सुरूवात करून त्यानंतर येत्या काळात महाराष्ट्र व संपूर्ण भारतात स्टार लोकलमार्टचा विस्तार होईल. 2023 पर्यंत राष्ट्रीय स्तरावर अशी 2000 स्टोअर उघडण्याची कंपनीची नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले