प्रतिनिधी / शिरोळ
शिरोळ तालुक्यातील शेतीचे पंचनामे करण्यासाठी संबंधित गावचे तलाठी, ग्रामसेवक अथवा त्यांचे प्रतिनिधी दिल्याशिवाय पंचनामे करण्यास कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी राजी नसल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे पूर बाधित शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यास अद्याप सुरुवात झाली नाही.
शिरोळ तालुक्यामध्ये 2019 साठी आलेल्या महापुरात कृषी विभागाने पंचनामे केले होते. त्यावेळी अनेक कटू प्रसंगांना या सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांना तोंड द्यावे लागले. त्याचा अनुभव लक्षात घेता चालू वर्षी महापुराने नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्यास हे सहाय्यक कृषी अधिकारी तयार नाहीत. पंचनामे करण्यासाठी त्या त्या गावातील तलाठी ग्रामसेवक अथवा त्यांचे प्रतिनिधी दिल्यास पंचनामे करण्यास तयार असून कामही सुलभ होणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी 2019 साली पंचनामा केला यावेळी महसूल विभागाने त्यांना झालेला खर्च देण्याची ग्वाही दिली होती. मात्र हा खर्च अद्याप मिळाला नाही. चालूही वर्षीही तुमचा होणारा खर्च महसूल विभागाने देणार असल्याचे सांगितले असले तरी मागील झालेला खर्च न दिल्याने नाराजी पसरले आहे.
शिरोळ तालुक्यात 18 ते 20 हजार हेक्टर क्षेत्रांतील महापुराने नुकसान झाल्याचा अंदाज असून यामध्ये 13 हजार अधिक हेक्टर ऊस पिकाचे, तर अन्य पाच ते सात हजार हेक्टर अन्य पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









