शिवाजी यांच्या धनगरी ढोल वादनाची नासाकडून दखल
विनोद शिंगे / कुंभोज
कुंभोज गावच्या शिरपेचात शिवाजी पालखी यांच्या रुपाने मानाचा तुरा रोवला गेला आहे. मंगळावर कोरले जाणार्या ढोल वादकाचे नावात शिवाजी पालखे कुंभोज यांचा नावाचा समावेश आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील सार्थ अभिमान व नासाकडून मिळालेले प्रशस्तीपत्र यामुळे पालखे यांचा कुंभोज परिसरात सत्कार व कौतुक होत आहे.
एका सर्वसामान्य धनगर समाजातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शिवाजी पालखे यांना जन्मापासूनच धनगरी ढोलवादनाची आवड होती. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या उद्देशाने सतत शिवाजी कुंभोज गावचे आराध्य दैवत हिवरखान मंदिरात अनेक कार्यक्रम प्रसंगी धनगरी ढोल वादन करणेसाठी आवडीने कार्यक्रमात सहभाग घ्यायचे. पण हेच ढोल वादन त्याला मंगळावर पोचवेल याची कधी जाणीवही नव्हती, शिवाजीच्या ढोल वादनची दखल अखेर कुपवाड जिल्हा सांगली येथील मूरसिद्ध वालुग ओवि मंडळ यांनी घेतली व शिवाजीच्या जीवनाला पुन्हा एकदा कलाटणी मिळाली. शिवाजीची ढोल वादनची कला सातासमुद्रा बरोबरच अखेर नासा च्या माध्यमातून मंगळावरही पोहोचली डॉक्टर बाळासाहेब मुगसळे यांनी मोलाची साथ दिली.
कला मग ती कोणतीही असो ती कलाकाराला वेगळी ओळख करून देते पैसा आणि प्रसिद्धी देते पण कुठे प्रयत्न जास्तीत जास्त सातासमुद्रापार पण कुंभोज तालुका हातकणंगले येथील शिवाजी केरबा पालखे यांचे नाव त्यांच्याकडील धनगरी ढोल वादन कलेने चक्क मंगळग्रहावर पोहोचले जाणार आहेत. तसे त्यांना नासाकडून प्रशस्तीपत्र नुकतेच प्राप्त झाले आहे. बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांना स्थान मिळाले असून कुपवाड जिल्हा सांगली येथील मूरसिद्ध वालुग व ओविकार मंडळांने डॉक्टर पैलवान बाळासाहेब मंगसुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पारंपरिक धनगरी ढोल वादन व ओवी या कलेचे जगातील चौदा देशात सादरीकरण केले आहे .