प्रतिनिधी/शिरोळ
येथील पंचायत समितीच्या सभापतीपदाची निवड येत्या सहा ऑगस्ट रोजी होणार आहे. विद्यमान पंचायत समितीच्या सभापती मिनाज जमादार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.पंचायत समितीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी ,काँग्रेस व शिवसेना अशी आघाडीची सत्ता आहे. राज्यात महा विकास आघाडीची सत्ता आहे त्याप्रमाणे या ठिकाणीही सत्तेत सहभाग मिळावा म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदस्यही आग्रही आहेत.
या पंचायत समितीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गणपतराव पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, शिवसेनेचे माजी आमदार उल्हास पाटील यांच्या आघाडीची सत्ता आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी संघटनेचे चार सदस्य आहेत. सभापती व उपसभापती पदाची संधी प्रत्येक सदस्याला मिळावी म्हणून आघाडी अंतर्गत पाच महिन्याचा कार्यकाळ ठरविण्यात आला आहे.
सहा ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ यांच्या अध्यक्षतेखाली निवडीची सभा बोलवण्यात आली आहे. विद्यमान सदस्या दिपाली परीट अथवा कविता चौगुले भागवत यांच्या पैकी कोणाला संधी मिळणार यांची उत्सुकता लागून राहिली आहे.