प्रतिनिधी / शिरोळ
शिरोळ तालुक्यात कोरोना विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होवू लागला आहे. जयसिंगपूर येथील एका शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खळबळ माजली आहे. सध्या या कार्यालयीन प्रमुखाची प्रकृती स्थिर असून कामकाजांनिमित्त अनेकजन त्यांच्या संपर्कात आले आहेत.
जयसिगपूर येथील या शासकीय कार्यालयात तालुक्यातील रस्ते, पुल, यासह अन्य बांधकामाची कामे केली जातात. या कार्यालयातील प्रमुख असलेल्या अधिकाऱ्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. वेळीच उपचार घेतल्याने त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे समजते. मात्र, त्यांच्या संपर्कात आलेल्या अनेकांचे धाबे दणाणले आहे. सध्या या कार्यालयात अधिकारी व कर्मचारी संख्या रोडावली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









