नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांचे आवाहन
प्रतिनिधी/शिरोळ
येथे जाहीर झालेल्या पाच दिवसाच्या जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसाद मिळाला. बंद काळात व्यापाऱ्यांसह नागरिकांनी सहकार्य केले आहे त्यामुळे उद्या सोमवारपासून शहरातील सर्व व्यवहार पूर्ववत सुरू ठेवण्याचा निर्णय शिरोळ नगरपरिषदेच्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला.
रविवारी सकाळी 10 वाजता नगरपरिषदेच्या सभागृहात जनता कर्फ्यू निर्णयाबाबत सर्वपक्षीय नेते, व्यापारी व नगरपालिका पदाधिकारी यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या सभेच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त नगराध्यक्ष अमरसिंह पाटील होते.
या बैठकीत शहरवासीयांचे आरोग्य तसेच व्यापाऱ्यांचे हीत याविषयी सविस्तर चर्चा झाली, यामध्ये उपनगराध्यक्ष प्रकाश गावडे , माजी आमदार उल्हास पाटील, भाजपाचे तालुका नेते अनिलराव यादव , शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई ,नगरसेवक पंडित काळे ,माजी सरपंच अर्जुन काळे ,धनाजी पाटील -नरदेकर, शहाजी गावडे, धनाजी चूडमुंगे, श्रीवर्धन माने- देशमुख, बाबा पाटील ,अमरसिंह धुमाळ आदींनी मनोगत व्यक्त केले,
दरम्यान , कोरोना पार्श्वभूमीवर शिरोळ शहरात यापूर्वी 10 दिवस जनता कर्फ्यू जाहीर झाला असताना या निर्णयाला व्यापाऱ्यांनी विरोध केला होता, त्यामुळे या निर्णयात बदल होऊन जनता कर्फ्यू 5 दिवसाचा लागू करण्यात आला. पुढील जनता कर्फ्यू बाबत निर्णय घेण्यासाठी महत्वपूर्ण बैठक असल्याने आजच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष होते मात्र शिरोळ बंद ऐवजी आज सोमवार पासून पुन्हा शिरोळ शहर सुरू ठेवण्याचा निर्णय झाल्याने अखेर वादावर पडदा पडला.
अखेर दिलगिरी व्यक्त
शिरोळ नगरपरिषदेने यापूर्वी 9 ते 18 सप्टेंबर असा दहा दिवसाचा जनता कर्फ्यू लागू केल्याने व्यापारी संघटनेने 9 सप्टेंबर रोजी बंद ला विरोध केला होता. मात्र हे विसरून जावे, व्यापारी संघटना आणि नगरपरिषद यांच्यामध्ये कोणतेही मतभेद नाहीत, नऊ सप्टेंबर रोजी झालेल्या प्रकाराबाबत व्यापारी संघटनेच्यावतीने मी दिलगिरी व्यक्त करतो असा खुलासा आंदोलन अंकुश संस्थेचे प्रमुख धनाजी चूडमुंगे यांनी रविवारी नगरपरिषदेच्या बैठकीत केला,
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









