प्रतिनिधी / शिरोळ
नगरपालिका व आरोग्य प्रशासनाने केलेल्या आवाहनानंतर शहरातील व्यापारी व भाजी विक्रेत्यांकडून अॅन्टीजन तपासणीसाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी आणखी काही व्यापारी व अन्य दुकानदार तसेच लक्षणे असणाऱ्या व्यक्तींसह ११० जणांची अॅन्टीजन तपासणी करण्यात आली. यामध्ये मटण विक्रेत्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर संपर्कातील एका मुलगीचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
येथील शिवाजी तख्तामध्ये नगरपालिका व ग्रामीण रुग्णालयाकडून शनिवारी अॅन्टीजन तपासणी मोहीम राबविण्यात आली. यामध्ये १२४ जणांची तपासणी करण्यात आली होती. एका आरोग्य कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्याला तात्काळ अलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले. शहरातील रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे प्रशासनाने जनजागृती सुरु केली आहे. व्यापारी, भाजी विक्रेते यांची अॅन्टीजन तपासणी केली जात आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जास्तीत जास्त तपासण्या करण्यावर भर दिला जात आहे. सोमवारी देखील ११० जणांची अॅन्टीजन तपासणी करण्यात आली. यामध्ये दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, लक्षणे असणाºया प्रत्येक नागरिकांनी अॅन्टीजन तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन पालिकेने केले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









