प्रतिनिधी/शाहुवाडी
शिरगाव तालुका शाहुवाडी येथे सटवाई नावाच्या शेताजवळ पूरूष जातीचे १ महिन्याचे अर्भक आढळून आल्याने एकाच खळबळ उडाली. ह्यासंबंधी शाहुवाडी पोलीसांत नोंद झाली आहे
पोलीसांतून मिळालेल्या माहीतीनुसा शिरगाव येथील आनंदा साधू सावंत यांच्या सटवाई नावाच्या शेताजवळ ओढ्याच्या पाण्यात एक महिन्याचे पुरूष जातीच अर्भक सकाळी अकराच्या सुमारास निदर्शनास आले. सर्वत्र कडक संचारबंदी असतानाही शिवाय सदर गाव बफर झोन परीसरात असताना देखील हे असे धाडस कोणी केली असेल याची ही चर्चा परीसरात जोर धरू लागली. या घटनेची फिर्याद पोलीस पाटील प्रकाश पोतदार यांनी शाहुवाडी पोलीसांत दिली असून यासंबंधी अधिक तपास सपोनि भालचंद्र देशमुख हे करीत आहेत.
Previous Articleगुजरात : ‘लूडो’ गेममध्ये हरल्याने पतीकडून पत्नीस मारहाण
Next Article शिरोळमध्ये दररोज 400 निराधारांना जेवणाची सोय








