प्रतिनिधी / कोल्हापूर
प्राथमिक शिक्षक बँकेला यंदाच्या आर्थिक वर्षात 2.14 कोटी रुपयांचा नफा झाला असून सभासदांना 7 टक्के लाभांश देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधामुळे देता येत नाही. तरीही तो देण्याचा प्रयत्न आहे. अशी माहिती चेअरमन प्रशांतकुमार पोतदार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. कोरोनामुळे रविवार 7 रोजीची वार्षीक सभा ऑनलाईन होणार असून सभासदांना लिंकद्वारे सहभागी होता येणार आहे. शनिवारी सर्व सभासदांना लिंक पाठवण्यात येईल अशी माहितीही पोतदार यांनी दिली.
प्रशांतकुमार पोतदार म्हणाले, राष्ट्रीयकृत बँका प्रमाणे सेवा देणारी ही एकमेव बँक असून रिझर्व्ह बँकिचे सक्षमतेचे सर्व निकष बँकेने पूर्ण केलेले आहेत. नुकतेच रिझर्व्ह बँकेने रेग्युलेशन ऍक्ट मध्ये बदल केले असून त्याचा परिणाम संपूर्ण सहकारी बँकिंग क्षेत्रावर होणार आहे. अशा परिस्थितीत बैंक सक्षमपणे चालवणे तारेवरची कसरत झालेली आहे. या वर्षी कोरोनामुळे देशामध्ये लॉकडाऊन समस्येला सर्वच बँकिंग क्षेत्राला तोंड द्यावे लागले. या सर्वावर मात करून संचालक मंडळाने 2 कोटी 14 लाखाचा नफा कमावला आहे. अहवाल सालामध्ये 571 कोटी 88 लाखाचा व्यवसाय केला असून गत वर्षीपेक्षा या वर्षी कोटी 72 लाखांनी व्यवसाया मध्ये वाढ झालेली आहे. असे पोतदार यांनी सांगितले. ते म्हणाले, सेवेत असताना कर्जदार मयत झालेस संपूर्ण कर्ज माफ करते तसेच डीसीपीएस सभासद मयत झालेस संपूर्ण कर्ज माफ करते व त्याच्या कुटुंबीयाना 5 लाखाची मदत देते. या वर्षी बँकेने बँकेकडील 21 सभासदांना 1 कोटी 24 लाख रुपयांचे कर्ज माफ केलेले आहे. तसेच बँकेकडे कर्ज नाही अशा 11 सभासदांना 1 लाख प्रमाणे मदत केलेली आहे. अशी एकूण 1 कोटी 35 लाखाचा सभासदांना लाभ दिलेला आहे.
या वेळी बँकेचे उपाध्यक्ष अरुण पाटील, संचालक नामदेव रेपे, जी. एस. पाटील, राजमोहन पाटील, बजरंग लगारे, संभाजी बापट, शिवाजी पाटील, साहेब शेख, दिलीप पाटील, आण्णासो शिरगावे, प्रसाद पाटील, डी. जी. पाटील, बाजीराव कांबळे, सुरेश कोळी, स्मिता डिग्रजे, लक्ष्मी पाटील, तज्ञ संचालक संदीप पाटील, सुमन पोवार, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत कुलकर्णी व अकौंटंट राजेंद्र चौगुले उपस्थित होते.
बँकेची आर्थिक स्थीती
सभासद 7098 बँकेचे
भाग भांडवल 1 कोटी 37 लाखानी वाढ
ठेवी 336 कोटी 66 लाख
कर्जे 235 कोटी 22 लाख
गुंतवणूक 117 कोटी 6 लाख
थकबाकी 1.27 टक्के.
एनपीए 2.61 टक्के आहे
सीडी रेशिओ 69 .87 टक्के
सीआरएआर 12.9 7 टक्के
ऑडीट वर्ग `अ’
कर्ज व्याज दर 10.50 टक्के
Previous Articleआजारास कंटाळून पती, पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या
Next Article गोकुळकडून पुन्हा उच्च न्यायालयात धाव









