प्रतिनिधी/शाहुवाडी
जिल्ह्यातील सर्वाधिक कोरोना रूग्ण ठरलेल्या शाहूवाडी तालुकयात आणखीन पाच नव्या रुग्णांची भर पडली आहे. यात मोळवडेतील ४,पिशवी येथील एका रुग्णाचा समावेश आहे. यामुळे तालुक्यातील कोरोनाबाधीत रूग्णांची संख्या १७५ वर पोहचली आहे. मात्र आतापर्यंत ११० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
कडवे पैकी लाळेवाडी येथील ५५ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे बळी गेला आहे. आज अखेर ११० कोरोनाबाधीत रुग्णाना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आणखी काही दिवसात पुणे, मुबंई व बाधीत भागातून सुमारे चार हजार लोक येण्याची शक्यता आहे.
Previous Articleसांगली : आटपाडीत ५० वर्षावरील नागरिकांचे घेतले स्वॅब
Next Article कोल्हापूर जिल्हय़ात डॉक्टरसह 15 कोरोना पॉझिटिव्ह








