महापालिकेकडून कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर आता दुसऱया लाटेची भीती व्यक्त होत आहे. दुसरी लाट रोखण्यासाठी राज्यस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. त्याच पद्धतीने कोल्हापूर जिल्हÎात आणि शहरातही प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. कोल्हापूर महानगरपालिकेनेही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित केली आहे. संशयित रूग्णांची माहिती संकलित करण्याबरोबरच उपाययोजनाही सुरू केल्या आहेत. त्याचबरोबर कोरोनाचे नियम तोडणाऱया नागरिक, अस्थापना, मंगल कार्यालये यांच्यावरही दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, शहरात बुधवारी 17 मार्च अखेर 47 ठिकाणी कंटेनमेंट झोन अर्थात प्रतिबंधित क्षेत्रे कार्यान्वित करण्यात आली असून या झोनमध्ये कोरोनाचे 105 ऍक्टीव्ह रूग्ण आहेत.
कोरोनाच्या पहिल्या संकट काळात शहरात एखाद्या भागात कोरोनाचा रूग्ण सापडला तर एक किलोमीटरपासून 500 मीटरपर्यंतचा परिसर सील केला जात होता. नंतर त्या बदल करण्यात आला. रूग्ण सापडलेली गल्ली, अपार्टमेंट आणि रूग्णाने वावर पेलेला परिसर सील केला जात होता. आता संबंधित घर सील केले जात असून त्या घराच्या परिसरातील काही भाग कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केला जात असून या भागातील इतर नागरिकांनी कोरोनाची तपासणी करून घेण्याबरोबर काळजी घ्यावी, इतरत्र वावर कमी करावा, असे निर्देश महापालिका आरोग्य प्रशासनाने दिले आहेत. त्यानुसार कार्यवाही सुरू आहे.
शहरातील महापालिकेच्या 11 नागरी आरोग्य केंद्रात लसिकरण केंद्रे उभारण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे या केंद्रांच्या अंतर्गंत कोरोनाचे रूग्ण सापडलेल्या ठिकाणी कंटेनमेंट झोनही तयार करण्यात आले आहेत. त्याचबरोबर शहरातील खासगी रूग्णालये आणि त्यांच्या डॉक्टरना कोरोनाचा संशयित रूग्ण आढल्यास त्या संदर्भातील माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाला देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. या खासगी दवाखाने, डॉक्टरना सूचना देण्यासाठी दोन नोडल ऑफिसरची नियुक्तीही करण्यात आली आहे. त्यात साथ रोग नियंत्रण अधिकारी डॉ. रमेश जाधव यांचाही समावेश आहे.
शहरातील कंटेन्मेंट झोनवर एक नजर
सध्या अस्तित्वात असणारे कंटेनमेंट झोन 47
बंद करण्यात आलेले कंटेनमेंट झोन 1131
आता पर्यत करण्यात आलेले एकूण कंटेनमेंट झोन 1178
यात कोरोनाच्या पहिल्या लाटेतील झोनचा समावेश आहे.
नागरी आरोग्य केंद्र निहाय सध्या असणारे कंटेनमेंट झोन
1) सावित्रीबाई फुले ना. आ. केंद्र 6
2) फिरंगाई ना. आ. केंद्र 1
3) कसबा बावडा ना. आ. केंद्र 6
4) राजारामपुरी ना. आ. केंद्र 3
5) पंचगंगा हॉस्पिटल 2
6) महाडिक माळ ना. आ. केंद्र 7
7) आयसोलेशन हॉस्पिटल 5
8) फुलेवाडी ना. आ. केंद्र 5
9) सदर बाजार ना. आ. केंद्र 5
10) सिद्धार्थ नगर ना. आ. केंद्र 5
11) मोरे माने नगर ना. आ. केंद्र 2