प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर शहरात गुरुवारी नवीन 142 कोरूना बाधित रुग्ण आढळून आले. यामुळे आज अखेर शहरातील रुग्णसंख्या चौदाशे बारा पर्यंत पोहोचले आहे.टिंबर मार्केट वारे वसाहत जवाहरनगर आणि ताराबाई पार्क हे शहरातील हॉटस्पॉट ठरले आहेत. कोल्हापूर शहरात संसर्गाचा कहर सुरूच आहे.
गुरुवारी दिवसभरात 142 रुग्ण आढळून आले. शहराच्या विविध भागातील हे रुग्ण आहेत .राजारामपुरी 8 कसबा बावडा 18 जवाहर नगर 5 यादव नगर दोन शिवाजी पेठ अकरा मंगळवार पेठ आठ संभाजीनगर सहा शाहूपुरी 3 ताराबाई पार्क एक लाईन बाजार तीन शनिवार पेठ 2 लक्षतीर्थ वसाहत पाच रंकाळा 1 नागाळा पार्क 6 रविवार पेठ 5 रंकाळा टॉवर 3 उत्तरेश्वर पेठ 4 विक्रमनगर तीन फुलेवाडी एक सानेगुरुजी वसाहत 2 आपटेनगर 5 लक्ष्मीपुरी चार उद्धव नगर 1 राजेंद्रनगर चार सिद्धार्थनगर सहा एसएससी बोर्ड 8 दसरा चौक एक देवकर पानंद एक साळुंखे नगर 1 शुक्रवार पेठ 1 रुइकर कॉलनी 2 शिवाजी पार्क 1 दुधारी एक गजानन महाराज नगर एक गंगावेश 2 जरग नगर 1 बापूराव नगर तीन सायबर चौक एक रायगड कॉलनी एक या भागात कोरुना बाधित रुग्ण आढळले आहेत .शहरात टिंबर मार्केट वारे वसाहत जवाहरनगर आणि ताराबाई पार्क हे हॉट स्पॉट आहेत .एकूण 167 प्रतिबंधित क्षेत्र होती .त्यापैकी 94 बंद झाले आहेत तर 73 अद्याप सुरू आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत .प्रतिबंधित क्षेत्रात महापालिकेच्यावतीने औषध फवारणी आणि सर्वे केला जात आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








