जिल्ह्यात 33 रूग्ण, 10 कोरोनामुक्त
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी शहरात कोरोनाने दोघांचा मृत्यू झाला. तर 19 नवे रूग्ण दिसून आले. जिल्ह्यात 24 तासांत कोरोनाचे 33 रूग्ण दिसून आले. यामध्ये गडहिंग्लज तालुक्यात 5 तर आजरा तालुक्यातील 3 आहेत. सक्रीय रूग्णसंख्या 244 झाली आहे. तसेच 10 जण कोरोनामुक्त झाले. दिवसभरात 1376 जणांची तपासणी केल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिली.
शहरात शुक्रवारी कोरोनाने बिंदू चौक येथील 75 वर्षीय पुरूषाचा सीपीआर हॉस्पिटलमध्ये तर टिंबर मार्केट येथील 72 वर्षीय पुरूषाचा नागाळा पार्क येथील खासगी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना बळींची संख्या 1 हजार 743 झाली आहे. यामध्ये ग्रामीण भागात 851, नगरपालिका क्षेत्रात 349, कोल्हापूर शहरात 385 व अन्य 158 आहेत. दिवसभरात 10 जण कोरोनामुक्त झाले. आजपर्यंत कोरोनामुक्तांची संख्या 48 हजार 383 झाली आहे.
गेल्या 24 तासांत कोरोनाचे 33 रूग्ण दिसून आले. यामध्ये आजरा 3, भुदरगड 0, चंदगड 0, गडहिंग्लज 5, गगनबावडा 0, हातकणंगले 2, कागल 0, करवीर 1, पन्हाळा 0, राधानगरी 0, शाहूवाडी 0, शिरोळ 0, नगरपालिका क्षेत्रात 3, कोल्हापूर शहरात 19 तर अन्य 0 जणांचा समावेश आहे. शुक्रवारी 1376 जणांची तपासणी केली. त्यातील 210 जणांची अँटीजेन टेस्ट केली आहे. शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर लॅबमधून शुक्रवारी 773 रिपोर्ट आले. त्यापैकी 736 निगेटिव्ह आहेत. अँटीजेन टेस्टचे 112 रिपोर्ट आले. त्यापैकी 110 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टचे 328 रिपोर्ट आले. त्यापैकी 309 निगेटिव्ह आहेत, अशी माहिती डॉ. माळी यांनी दिली.
दिवसभरात 1376 जणांची तपासणी, सक्रीय रूग्णसंख्या अडीचशेकडे कोरोना रूग्ण : 33 (एकूण – 50,370) कोरोनामुक्त : 10 (एकूण – 48,383) कोरोना मृत्यू : 2 (एकूण मृत्यू - 1743) सक्रीय रूग्ण : 244; 24 तासांत 1376 जणांची तपासणी









