गेल्या 24 तासांत 281 संशयितांची तपासणी
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात गेल्या 24 तासात कोल्हापूर शहरात 10 नवे रूग्ण तर राधानगरी, चंदगड तालुक्यात प्रत्येकी 1 रूग्ण दिसून आला. दिवसभरात चौघे कोरोनामुक्त झाले. पण कोरोना मृत्यूची नोंद निरंक राहिली, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिली.
जिल्ह्यात आजपर्यंत कोरोना बळींची संख्या 17363 झाली आहे. यामध्ये ग्रामीण भागात 850, नगरपालिका क्षेत्रात 349, महापालिका क्षेत्रात 380 तर अन्य 157 जणांचा समावेश आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 12 नवे रूग्ण मिळाले. यामध्ये चंदगड 1, राधानगरी 1, गगनबावडा 0, करवीर 0, शाहूवाडी 0, अन्य 0 आणि कोल्हापूर शहरातील 10 रूग्णांचा समावेश आहे. रविवारी चौघे कोरोनामुक्त झाल्याने कोरोनामुक्तांची संख्या 48 हजार 290 झाली आहे. नव्या 12 रूग्णांमुळे कोरोना रूग्णसंख्या 50 हजार 186 झाली आहे.
दरम्यान, शेंडा पार्क येथून रविवारी आलेल्या 390 रिपोर्टपैकी 375 निगेटिव्ह आहेत. ऍटीजेनचे 28 रिपोर्ट आले. ते सर्व निगेटिव्ह आहेत. ट्रनेटचे 92 रिपोर्ट आले. त्यापैकी 88 निगेटिव्ह आहेत. जिह्यात सध्या 160 सक्रीय रुग्ण आहेत. दिवसभरात 281 जणांची तपासणी केल्याची माहिती डॉ. माळी यांनी दिली.
राधानगरी, चंदगडमध्ये 1 रूग्ण, 4 कोरोनामुक्त
पॉझिटिव्ह रूग्ण 12, कोरोनामुक्त 4, कोरोना मृत्यू 0
आजपर्यतचे कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण ः 50 हजार 186
आजपर्यतचे कोरोनामुक्त रूग्ण ः 48 हजार 290
सध्या उपचार घेत असलेले कोरोना रूग्ण ः 160
आजपर्यतचे एकूण कोरोना बळी ः 1736









