प्रतिनिधी / कोल्हापूर
बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर शहरातील कुक्कुट पालन करणाऱया व्यावसायिकांसह चिकन विक्रेते, हॉटेल व्यावसायिक आणि नागरिकांनी आरोग्य विषयक दक्षता घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. बर्ड फ्लूचा संभाव्य फैलाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनांची अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही केल्या आहेत. त्याचबरोबर शहरात जिल्ह्यातील भागासह परजिल्ह्यातून कोंबड्या अथवा पक्षी आणणाऱयांना रितसर परवानगी घ्यावी लागणार आहे.
महापालिकेने केलेल्या सूचना अशा : बर्ड फ्लू विषाणू स्थलांतरीत पक्षांमधून पसरत असल्याने संक्रमित ठिकाणांवरून पक्षी आणणे, वाहतूक करण्याबाबत अधिक दक्षता घ्यावी. तसेच मनपा क्षेत्रामध्ये पक्षी आणण्यापूर्वी रितसर परवानगी घ्यावी. पक्षी, कोंबडया यांचे पिंजरे आणि ज्या भांडयात त्यांना रोज खाद्य दिले जाते अशी भांडी दररोज डिटर्जन्ट पावडरने धुवा. शिल्लक उरलेल्या मांसाची योग्य विल्हेवाट लावा. एखादा पक्षी मृत झाला तर अशा पक्ष्यांना उघडÎा हाताने स्पर्श करू नका. जिल्हा तसेच विभागीय नियंत्रण कक्षास ताबडतोब कळवा. पक्षी स्त्रावासोबत कोणत्याही स्थितीत संपर्क टाळावा. कच्च्या पोल्ट्री उत्पादनासोबत काम करताना हात पाणी व साबणाने वारंवार धुवा, व्यक्तीगत स्वच्छता राखा, परिसर स्वच्छ ठेवा. कच्चे चिकन/ चिकन उत्पादनासोबत काम करताना मास्क आणि हॅण्ड ग्लोव्हजचा नियमित वापर करावा.
पुर्ण शिजवलेल्या (100 डिग्री सेल्सीअस) मांसाचाच खाण्यासाठी वापर करावा. गल्लीत अथवा परिसरातील तलावामध्ये पक्षी येत असतील तर या ठिकाणी सुयोग्य प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी वन विभाग, पशुसंवर्धन विभागास कळविणेत यावे. कच्चे चिकन, कच्ची अंडी खाऊ नका. अर्धवट शिजलेले चिकन, पक्षी, अर्धवट उकडलेली अंडी खाऊ नका, पूर्णपणे शिजलेले मांस आणि कच्चे मांस एकत्र ठेऊ नका. आजारी दिसणाऱया अथवा सुस्त स्थितीत पडलेल्या पक्षांच्या संपर्कात येऊ नका. यासोबतच एखाद्या भागात मृत पक्षी आढळल्यास पशु संवर्धन विभाग जिल्हा संवर्धन अधिकारी, उपआयुक्त पशुसंवर्धन कार्यालय यांच्याशी संपर्क करावा.
Previous Articleदोन वर्षे फरार कोंडवेचा माजी सरपंच शरद बोडकेला अटक
Next Article अत्याचार रोखण्यासाठी शिवकालीन मर्दानी कला शिका









