प्रतिनिधी / कोल्हापूर
महापुरामुळे कोल्हापूर महापालिकेचे शिंगणापूर, बालिंगा, नागदेवाडी उपसा केंद्र पाण्याखाली गेले होते. यातील बालिंगा आणि नागदेवाडी येथील उपसा केंद्र सुरू झाले होते. तर, शिंगणापूर येथील उपसा केंद्राचे काम सुरू होते. काल, मंगळवारी सायंकाळी सहा वाजता येथील काम पूर्ण झाले आहे.
पुईखडी जलशुध्दीकरण केंद्राकडे पाणी पुरवठा सुरु झाला आहे. त्यामुळे बुधवारी संपूर्ण शहरातील पूर्ण क्षमतेने पाणी पुरवठा होणार आहे, अशी माहिती जल अभियंता अजय साळुंखे यांनी दिली आहे. तब्बल बारा दिवसानंतर संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा सुरू होणार आहे.