प्रतिनिधी/कोल्हापूर
शहरातील लुगडी ओळ येथील मुख्य मटण मार्केट मध्ये मटणा सह चिकन आणि मासे विक्री बंद राहणार आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा खाटीक समाजाचे अध्यक्ष विजय कांबळे यांनी दिली. मुख्य मटण मार्केट जरी बंद राहणार असले तरी जिल्ह्यात इतरत्र मटण, चिकन व मासे विक्री सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तीन दिवसापूर्वी शनिवारी मुख्य मटण मार्केटमध्ये खरेदीसाठी गर्दी झाली होती. यावेळी चिकन खरेदीसाठी तीन होम कॉरंटाईन व्यक्ती आल्या होत्या. त्यातील एक व्यक्ती चिकन खरेदीसाठी मार्केटमध्ये केली तर उर्वरित दोन व्यक्ती मार्केटच्या बाहेर उभ्या होत्या. स्थानिक नागरिकांसह लोकांना ही बाब लक्षात येताच त्यांनी भागातील रहिवाशांना धोका होऊ नये म्हणून आगामी काही काळासाठी मुख्य मटण मार्केट बंद ठेवावे अशी विनंती केली. त्यानुसार मुख्य मटण मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय झाला असल्याचे विजय कांबळे यांनी सांगितले. मात्र जिल्ह्यात सर्वत्र मटण चिकन व मासे विक्री सुरू राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांनी मटन चिकन अथवा मासे खरेदीसाठी आल्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने सांगितलेल्या सूचना आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करावे, असे आवाहनही विजय कांबळे यांनी केले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









