प्रतिनिधी / शाहुवाडी
सौते ता. शाहूवाडी येथील लक्ष्मी शामराव पाटील (वय 55) ही महिला वीज अंगावर पडून जागीच ठार झाली. तर सुनंदा कृष्णा पाटील ही महिला गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली. जखमी महिलेस उपचारासाठी सी.पी.आर रुग्णालय, कोल्हापूर येथे दाखल केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मी पाटील या जांभूळ नावाच्या शेतात भुईमुग काढण्यासाठी गेल्या होत्या. ढगाळ वातावरण व विजेचा गडगडाट सुरू झाल्याने त्या घरी येत असतानाच वाटेत त्यांच्या अंगावर वीज पडली. यात त्या जागीच ठार झाल्या. तर सोबत असलेल्या लक्ष्मी कृष्णा पाटील या गंभीर जखमी झाल्या. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी लक्ष्मी पाटील यांना सीपीआर रुग्णालय कोल्हापूर येथे दाखल केले.
दरम्यान शाहूवाडी तालुक्यात सायंकाळच्या दरम्यान अचानक विजेचा गडगडाट व जोराचा पाऊस झाल्याने सर्वांची एकच धावपळ उडाली होती.
Previous Articleवाई तालुक्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार
Next Article राजाराम कारखाना : सत्ताधारी गटावर सभासदांचा विश्वास









