‘शुन्य अपघात’ संकल्पनेचा मुख्य उद्देश
वार्ताहर / गोकुळ शिरगाव
कोल्हापूर विमानतळावर सुरक्षा जागृती सप्ताहाचे सुरुवात झाली. सात दिवस चालणाऱ्या या सप्ताहामध्ये विमानतळावरील दररोज सर्वकश सुरक्षा उपायांचे प्रात्यक्षिके व प्रबोधन करण्यात येणार असून या अंतर्गत आज सप्ताहाच्या पहिल्या दिवशी अग्निशमन सुरक्षा विषयक विविध गोष्टींचा सराव व प्रात्यक्षिके घेण्यात आली.

यावेळी विमानतळावरील अग्निशमन विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी थरारक कशी ‘हॉट फायर ड्रिल’ चे प्रात्यक्षिकांनी अंगावर रोमांच उभे राहिले. यावेळी विविध प्रकारच्या अग्निशमन साहित्यांचे प्रात्यक्षिकही एक वेगळा अनुभव देणारे होते.
या सुरक्षा सप्ताहचा मुख्य उद्देश शुन्य अपघात असून त्यासाठी विमानतळावरील सर्वच विभागातील कर्मचारी शंभर टक्के सजग असतात. यावेळी विमानतळावरील सर्व अग्नीशमन साधनांची तपासणी करून सर्व साधने अद्ययावत करण्यात आली. सर्व कर्मचाऱ्यांना सुरक्षाविषयक नवीन संकल्पनांची व तंत्रज्ञानाची माहिती या प्रसंगी देण्यात आली.
तब्बल तीन फायरफायटर वाहने, चार राज्यातील प्रवाशांची तपासणी
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या संभाव्य लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या सूचनेवरून गोवा, दिल्ली, राजस्थान व गुजरात या राज्यातून येणाऱ्या सर्व प्रवाशांची औष्णिक तपासणी करण्यात येणार असून नियोजित वेळापत्रकाप्रमाणे सर्व विमानसेवा सुरू राहणार आहेत. अशी माहिती कोल्हापूर विमानतळ प्राधिकरणाचे संचालक कमलकुमार कटारिया यांनी दिली.









