विस्तारीकरण व इतर कामांचा घेतला आढावा
वार्ताहर / गोकुळ शिरगाव
उजळाईवाडी येथील कोल्हापूर विमानतळास कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी भेट देऊन विमानतळावर सुरू असलेल्या विस्तारीकरणाच्या कामांचा आढावा तसेच विमानतळावरील आत्तापर्यंत झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला यामध्ये विमानतळाची टर्मिनल बिल्डिंग धावपट्टी विविध शहरांना सुरू झालेल्या विमानसेवा प्रवाशांचा प्रतिसाद व प्रस्तावित व सध्या सुरू असलेल्या सर्वच कामांची तपशीलवार माहिती घेतली तसेच विस्तारीकरण सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली याठिकाणी विस्तारीकरणासाठी आवश्यक असलेल्या 64 एकर जागे संदर्भातही माहिती घेऊन ही जागा जिल्हाधिकारी व राज्य सरकार यांच्याकडे योग्य तो पाठपुरावा करून लवकरात लवकर संपादित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
तसेच आमदार ऋतुराज पाटील यांनी नाईट लँडिंग धावपट्टी विस्तारीकरण टर्मिनल बिल्डिंग विमानतळ परिसरातील बगीच्या अशा इतर अनेक कामांचा आढावा घेत समाधान व्यक्त केले व भविष्यात गरज पडेल तिथे संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी गोकुळचे माजी संचालक बाबासो चौगुले विमानतळ प्राधिकरणाचे संचालक कमल कटारिया बालाजी इंफ्राटेक चे शंभुराजे मोहिते विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी व कर्मचारी, उपस्थित होते.
कोल्हापूर विमानतळ भारतातील नामांकित विमानतळ पैकी एक बनवण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असून यासाठी ज्या काही उणिवा निर्माण होतील त्या सर्व दूर करून लवकरात लवकर विमानतळ विस्तारीकरणाची सर्व कामे पूर्ण करणार असून या विमान सेवेला प्रवाशांचा मिळणारा उत्तम प्रतिसाद ही एक विशेष समाधानाची बाब आहे.असे आमदार ऋतुराज पाटील त्यावेळी ते म्हणाले