विभाग नियंत्रकांची कारवाई
कोल्हापूर : प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यातील एसटी सेवा सुरळीत होत असताना विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील मध्यवर्ती बस स्थानक वगळता जिल्ह्यातील सर्व आगारमधील आणखी 5 एसटी कर्मचाऱ्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या 103 झाली असून आज नवीन सेवासमाप्ती करण्यात आली नसली तरी एकूण सेवासमाप्ती आकडा 18 आहे दरम्यान, या कारवाईमुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या मध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या २० दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत संप राज्यभरात सुरू आहे. एसटी महामंडळाचे विलीनीकरण व्हावे, या मागणीवर एसटी कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत. दरम्यान, आज कोल्हापूर विभागातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील काही कर्मचाऱ्यांनी संपातून माघार घेत कामावर रुजू झाले. त्यामुळे जिल्ह्यातील एसटी सेवा अशांतः सुरू झाले. असे असताना कोल्हापूर जिल्ह्यातील मध्यवर्ती बस स्थानक आगार वगळता जिल्ह्यात आजही संप सुरू आहे.