कसबा सांगाव : वार्ताहर
कागल हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये इलेक्ट्रिक इंसुलेटर तुटली आहे. ही तार मुडशिंगी ते चिकोडी मार्गावरील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये हलसवडे ते सोक्टास कंपनीच्या हद्दीपर्यंत 220 केवी शेरावत पोलवरून तुटून खाली पडली . यामुळे औद्योगिक वसाहतीमधील रेमंड चौकात वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
शुक्रवार, 2 एप्रिल रोजी सकाळी ६ : १५ वाजण्याच्या सुमारास ही घडली . यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नाही. या पोलवरती ज्यादा विजेचा भार नाही. ६३ कि .मी.एकूण लाईन गेली आहे. जेंव्हा विजेची कमतरता भासते तेंव्हाच चिकोडीला यातून विजपुरवठा केला जातो.
मुख्य तार तुटण्याचे कारण म्हणजे कारखान्यातील कार्बन, धुळ, राख व हवेतील आर्द्रता, यामुळे हा अपघात घडला असल्याचे महापारेषणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता एच. व्ही .परीट यांनी सांगितले. तार तुटून पडताच तात्काळ परीट यांनी आपले कर्मचारी घेऊन पडलेल्या तारा तात्काळ वरती घेऊन रस्ता वहातुकीसाठी खुला केला. तीन तासात पूर्ववत लाईन चालू होईल असे ते म्हणाले .
Previous Articleसेक्स सीडी प्रकरण: महिलेच्या वडिलांची हाय कोर्टात धाव
Next Article पुणे मिनी लॉकडाऊनला भाजपचा विरोध









