प्रतिनिधी/वाकरे
वाकरे (ता. करवीर) येथील शेतकरी पै. तानाजी पाटील आपल्या “कळवातीण” नावाच्या शेतात आज, मंगळवारी दुपारच्या सुमारास भात पीकाची कापणी करण्यासाठी गेले असता त्यांना बिबट्यासदृश्य प्राण्याने दर्शन झाले. यावेळी त्यांनी आरडाओरड केल्याने हा प्राणी पळून गेला. यानंतर करवीर वनविभागाच्या वनरक्षक कोमल रहाटे यांनी त्वरित प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन या प्राण्याच्या पायाच्या ठशांची पाहणी केली. त्यांनी हे ठसे बिबट्या सदृश्य प्राणी आणि त्याच्या पिलाचे असल्याची शक्यता व्यक्त केली. दरम्यान या घटनेमुळे शेतकर्यांमध्ये खळबळ माजली असून ऐन सुगीच्या दिवसात भीतीचे वातावरण पसरले आहे.
गावातील शेतकऱ्यांनी खबरदारी म्हणून या परिसरात जाऊ नये अथवा जायचे असेल तर सुरक्षितपणे जावे असे आवाहन त्यांनी केले आहे. यावेळी दक्षता सदस्य शरद काळे, विकास पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की पै.तानाजी पाटील व त्यांच्या पत्नी लता हे दोघेजण सकाळी कुरण परिसरातील “कळवातीण” नावाच्या शेतात भात कापणी करण्यासाठी जागा करण्यासाठी गेले होते. भात कापणी करीत असताना त्यांच्या पत्नीला शेतात सळसळ जाणवली. त्यांनी पाहिले असता एक बिबट्या सदृश्य प्राणी आणि त्याचे पिल्लू त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी आरडाओरडा केला असता हा प्राणी शेतातून पळून गेला. पाटील यांनी याची माहिती कोतवाल बाजीराव कांबळे यांना दिली. कांबळे यांनी करवीर वन विभागाला या संदर्भात माहिती दिली. यानंतर वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. यानंतर त्यांनी हे ठसे बिबट्या सदृश्य प्राणी आणि त्याच्या पिलाचे असल्याची शक्यता व्यक्त केली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









