उचगाव / वार्ताहर
वसगडे (ता. करवीर) येथील अल्पवयीन मुलीस फूस लावून तिचे अपहरण केल्याबद्दल अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला.
मंगळवारी (दि.६ ) शाळेमध्ये प्रोजेक्ट बुक जमा करून येते असे सांगून ती पीडित मुलगी घरातून बाहेर पडली. तिच्या वडिलांसह कुटुंबीयांनी सर्वत्र शोधाशोध केली पण ती मिळून आली नाही. तिच्या मोबाईलवर संपर्क साधला असता तो झाला नाही.
कोणी तरी अज्ञाताने ती अल्पवयीन म्हणजे दहावीत शिकत असल्याचे माहित असूनही फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद पीडित मुलीच्या वडिलांनी दिली आहे. याबाबत गांधीनगर पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार बजरंग हेब्बाळकर करीत आहेत.









