प्रतिनधी / गारगोटी
गारगोटी वनपरिक्षेत्रातील संयुक्त वन व्यवस्थापन समितींच्या कामकाजाचा आढावा व वन्य प्राण्यांच्या हल्यात जखमी झालेल्या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई धनादेशाच्या वाटप आज आमदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संयुक्त वनव्यवस्थापन समितींच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. राज्यात संयुक्त वन व्यवस्थापन समितीमार्फत राबविण्यात येणाऱ्या इको टुरिझम, संत तुकाराम, वनग्राम योजना, बायोगॅस व कुकींग गॅस इ. योजनांबाबतचा निधी संयुक्त वनव्यवस्थापन समितीला देण्यात येतात. परंतू प्रत्यक्षात मात्र वनविभागाचे सचिव वनविभागाची कोणतीही योजना राबविताना समिती अध्यक्ष व सदस्यांना विचारात न घेता अवाजावी व चुकीच्या पध्दतीने खर्च करत असल्याच्या तक्रारी समिती अध्यक्ष तथा सरपंच महोदयांकडून प्राप्त होत असल्यामुळे गारगोटी गारगोटी वनपरीक्षेत्रातील संयुक्त वन व्यवस्थापन कामाचा आढावा आज घेण्यात आला.
यावेळी असे निदर्शनासल आले की, बहुतांश संयुक्त व्यवस्थापन समित्यांना आपले कडील निधीचा विनीयोग चुकीच्या पध्दतीने करण्यात आला असून या अंतर्गत कोणकोणती कामे घेण्यात आली आहेत. याची माहिती सरपंच तथा समिती अध्यक्ष व सदस्य यांना माहिती देखील नाही. याबाबत आमदार प्रकाश आबिटकर यांनी विचारणा केली असता वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्याकडे कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती. तसेच संयुक्त वनव्यवस्थापन समितीचा निधी खर्च करण्यासाठी ग्रामसभेची परवानगी न घेता कामे हाती घेण्यात आली असल्याचे निदर्शनास आले.
यावेळी बोलताना आमदार आबिटकर म्हणाले, संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या निधीचा चुकीच्या पध्दतीने वापर करून भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांना कडक कारवाई करणार असून याबाबत वनमंत्री संजय राठोड यांचेकडे लेखी तक्रार करणार असल्याचे सांगितले.
तसेच समितीचा निधी खर्च न करता दरवर्षी लेखापरिक्षण होणे बंधनकारक असताना कोणत्याही समितीच्या निधीचे लेखापरीक्षण झालेले नसून शासनाचे कोट्यावधी रुपये वनविभागातील वरिष्ठ अधिकारी यांच्या संगनमताने खर्च होत असल्याची बाब निदर्शनास आले. तसेच यापुढे समितीचे दप्तर पुर्णवेळ ग्रामपंचायतीमध्ये उपलब्ध करण्यात यावे व समिती अध्यक्ष व सदस्य यांचे पुर्व परवानगी शिवाय कोणतेही काम हाती घेण्यात येवू नये अशा सुचना त्यांनी केल्या. यावेळी सरपंच संघटणेचे अध्यक्ष धनाजी खोत,यांच्यासह तालुक्यातील सरपंच व वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
Previous Articleकोल्हापूर : यशवंतचे कोविड समर्पित रुग्णालय पन्हाळ्यासाठी वरदान – आरोग्यमंत्री यड्रावकर
Next Article उपवडे येथे शेततळे फुटल्याने पिकासह शेतजमीनीचे नुकसान









