प्रतिनिधी / कोल्हापूर
गीता सागर पाटील (वय 34 रा. भाटणवाडी ता करवीर) या महिलेचा लस घेतल्यानंतर काही वेळाने मृत्यू झाला. करवीर पोलीस ठाण्यात तिच्या मृत्यूची नोंद झाली आहे. गावातील लसीकरण केंद्रात गीता पाटील यांनी सकाळी लस घेतली. यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्याने जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. पुढील उपचारासाठी सीपीआर मध्ये दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला.









