प्रतिनिधी / शिरोळ
लग्नसमारंभाच्या कार्यालयातील वधू पक्षाच्या रूम मध्ये प्रवेश करून सोन्या चांदीच्या बरोबर मौल्यवान वस्तू चोरी करणाऱ्या चोरट्यास शिरोळ पोलीस ठाण्याच्या गुन्हेशोध पोलीस पथकाने मुसक्या आवळल्या त्याच्याकडून 44 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडन मिळालेली माहिती अशी की आगर भाग हद्दीतील कोरे मंगल कार्यालयामध्ये 28 जून रोजी दुपारी एक वाजता फिर्यादी स्वप्निल बाळासो कुडचे रा. गडमुडशिंगी हे नातेवाईकाच्या लग्नसमारंभासाठी पत्नी श्वेतासह आले होते. वधू पक्षाच्या रूममध्ये ठेवण्यात आलेल्या पर्समधील कानातील दोन सोन्याचे टॉप दोन मोबाईल रोख रक्कम असा बत्तीस हजार रुपये किंमतीचा माल चोरीस गेल्याची फिर्याद दिली होती.
या परिसरात लग्न समारंभाचा गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी डल्ला मारण्याचा अनेक घटना घडल्या होत्या अखेर गुन्हे शोध पथकातील पोलीस नाईक हनुमंत माळी पोलीस कॉन्स्टेबल ताहीर मुल्ला यांनी कबनूर इचलकरंजी येथील संशयित आरोपी इमतियाज मुमताज हुसेन अन्सारी वय वर्षे 49 यास ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या सर्व माल हस्तगत करण्यात आले आहेत. त्यास अटक करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक हनुमंत माळी हे करीत आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








