सोमवारी शंभर टक्के बंदचे महाविकास आघाडी कार्यकर्त्यांकडून बैठकीत आवाहन
उचगाव /वार्ताहर
उत्तरप्रदेश लखिमपुर येथे घडलेल्या घटनेच्या निषेर्धात सोमवारी महाविकास आघाडीकडून पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला पाठींबा देत करवीर तालुक्यातील उचगाव येथे कँडल मार्च काढून घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला.
शांततेत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडण्यात आले. याच्या निषेर्धात महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यासह उचगावमध्ये हा बंद १०० टक्के यशस्वी करण्याचा निर्धार उचगाव येथील कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला. ही बैठक सरपंच मालूताई काळे, माजी सरपंच गणेश काळे, पैलवान मधुकर चव्हाण, उपसरपंच प्रदीप बागडी यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली. यावेळी दिनकर पोवार, दीपक रेडेकर, पंचायत समिती सदस्य सुनील पोवार, शिवसेना तालुका प्रमुख राजू यादव, सचिन चौगुले आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









