इचलकरंजी पोलीस ठाण्याची कारवाई
इचलकरंजी / प्रतिनिधी
इचलकरंजीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार अनिल रामचंद्र काजवे (वय.37, रा.आसरानगर, इचलकरंजी ) यांने पहिली पत्नी असताना शेजारी राहणाऱ्या एका युवती बरोबर बेकायदेशीरपणे दुसरे लग्न केले आहे. त्या कारणावरून संबंधीत युवतीचे कुटुंबीय व गुन्हेगार काजवे याचेत एकमेकाकडे वारंवार रागाने बघणे, खुन्नस देणे असे प्रकार सुरू होते.
या कारणावरून गुन्हेगार अनिल चंद्रकांत काजवे व त्याचा भाऊ अमोल विलास काजवे (दोघे रा.आसरानगर, इचलकरंजी ) यांनी घातक शस्त्रे बाळगणे व संबंधीत युवतीच्या काकाची मोटरसायकल पेटवून दिली होती. या प्रकरणी इचलकरंजी व शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. याचदरम्यान संबंधीत युवतीच्या भावानी गुन्हेगार अनिल काजवे व त्याचा भाऊ अमोल काजवे या दोघा पासून कुटुंबीयांच्या जीवितास धोका आहे, म्हणून इचलकरंजी पोलिस ठाण्यात तक्रारी अर्ज दिला होता.
यावरून पोलिसांची काजवे बंधूकडून गंभीर व दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा करतील खात्री झाल्याने, इचलकरंजी पोलिसांनी या दोघाविरोधी सीआरपीसी 151 (एक) प्रमाणे अटक केली. त्याना शुक्रवारी (25 डिसेंबर) न्यायालयात हजर केले. त्यावेळी न्यायालयाने त्यांना सीआरपीसी 151 (तीन) प्रमाणे 7 दिवस स्थानबद्ध ठेवण्याचा आदेश केलेला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









