नूतन पोलीस उपाधिक्षक प्रणील गिल्डा यांच्या पथकाची कारवाई
प्रतिनिधी / चंदूर
चंदूर(राकेश पाटील) हातकलंगले पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रुई गावांमध्ये अवैध रित्या दारू विक्री सुरू असल्याचे माहिती माननीय पोलीस उपआधीक्षक प्रणील गिल्डा यांना सूत्राकडून मिळाली. माहिती मिळाल्यानंतर माननीय पोलीस उपअधीक्षक पोना 14 53औदुंबर कोरे ,पोना 87 अब्दुल पटेल,पो कॉ 17 36 जकरिया बाणदार व चालक पोहेकॉ 16 13 दिलावरसिंग पाडवी यांचे पथक घेऊन रुईतील माने नगर येथे धाड टाकून उमेश बाळासो खामकर वय 36राहणार माने नगर रुई याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 4355 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यांनी अचानक केलेल्या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध व्यवसाय करणाऱ्यामध्ये जबर बसली आहे.








