ऑनलाईन टीम/ कोल्हापूर
रिव्हॉल्वर विक्रीसाठी आलेल्या एकास कोल्हापुरात अटक करण्यात आली. विलास दत्तात्रय मेंगाणे, (वय-५०, रा. चंद्रे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) असे या ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने ही कारवाई केली.
याबाबत माहिती अशी की, मेंगाणे हा त्याच्याजवळ असलेली बेकायदेशीर रिव्हॉल्वर कोल्हापूर-गारगोटी रोडवरील चुये फाटा येथे विक्रीसाठी घेवून येत होता. याची माहिती पोलिसांनी मिळाली. यामाहितीवरुन पोलिसांनी मेंगाणे याला चुये फाट्यावरुन ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडून पोलिसांनी ही रिव्हॉल्वर जप्त केली. या रिव्हॉल्वरची किंमत साडे सात हजार आहे. यानंतर पोलिसांनी मेंगाणे यास मुद्देमालासह इस्पुर्ली पोलीस ठाण्यात हजर केले. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









