राधानगरी / प्रतिनिधी
राधानगरी तालुक्यात महसूल विभागातील मंडल अधिकारी, तलाठी,कोतवाल आणि पुरवठा विभागातील अधिकारी आणि कर्मचारी आर्थिक लोभापायी दप्तर दिरंगाई करत असल्याच्या तक्रारी आज झालेल्या आढावा बैठकीत झाल्या,यावेळी तहसीलदार मीना निंबाळकर यांनी शासकीय कामासाठी पैशाची मागणी होत असल्यास त्याची माहिती द्या संबंधितावर कडक कारवाही केली जाईल पात्र आणि गरजू लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ निश्चित दिला जाईल असे सांगितले.
राधानगरी इथल्या राजर्षी शाहू सभागृहात आमदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत महसूल प्रशासनासंदर्भात आढावा बैठक आणि संजय गांधी निराधार योजना नवनियुक्त सदस्यांचा सत्कार कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी नागरिकांनी महसूल प्रशासनासंदर्भात नाराजी व्यक्त करत शासकीय कामांसाठी पैसे दिल्याशिवाय कामेच केली जात नाहीत यामुळे पात्र लाभार्थींना योजनेपासून वंचित राहावे लागते.
याचबरोबर सधन कुटूंबातील लभार्थींना शासकीय योजनांचा लाभ मिळतो हे थांबले पाहिजे,याचबरोबर कसबा तारळे मंडल कार्यालयाअंर्गत येणारी पिरळ, सावर्धन पडळी या गावातील पंधराशे सत्तर खातेदारांपैकी अकराशे खातेदारांच्या ऑनलाइन सातबारा उताऱ्यात त्रुटी आहेत ही महसूल विभागाची चूक असताना या त्रुटी दूर व्हाव्यात यासाठी संबंधित शेतकरी गेली सहा वर्षे चक्रा मारत आहेत त्या त्रुटी तात्काळ दूर करण्याची मागणी पिरळ गावचे माजी सरपंच अमरेंद्र मिसाळ यांनी केली.विक्रम पालकर या शेतकऱ्याने आपल्या शेताच्या फेरफार नोंदीबद्दल मंडल अधिकाऱ्यांनी आर्थिक मागणी साठी दिरंगाई केल्याचा आरोप केला.
याप्रसंगी तहसीलदार मीना निंबाळकर यांनी महापूर आणि कोविड सारख्या आपत्तीजनक परिस्थितीत काही लोकांकडून दिरंगाई होत असतील हे मान्य केले तालुक्यातील गरजू आणि पात्र लाभार्थ्यांना संजय गांधी, श्रावण बाळ यासारख्या योजनांचा लाभ निश्चितच मिळेल एखादा लाभार्थी पात्र असेल मात्र काही त्रुटी असतील तर त्याला निकष लावू नका ज्यास्तीत ज्यास्त लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्याच्या सूचना महसूल प्रशासनाला दिल्या,यावेळी गोकुळचे संचालक अभिजित तायशेट्ये,संजय गांधी योजनेचे अध्यक्ष अरुण जाधव,पणन महामंडळाचे संचालकनंदकुमार सूर्यवंशी आदी उपस्थित होते.









