प्रतिनिधी/राधानगरी
राधानगरी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये बुडून एका सराफ व्यावसायिकाचा मृत्यू झाला. विवेक कमलाकर नागवेकर (वय -45, रा, एव्हरग्रीन होम, नागाळा पार्क, कोल्हापूर) असे या सराफ व्यावसायिकाचे नाव आहे.
या बाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती की, रंगपंचमी व गुडफ्रायडेची सुट्टी असल्याने कोल्हापूर येथील सागर घाटगे, आशिष पाटील, अखिल नागारजी, मनाल जाधव ,महेश खालीपे व मयत विवेक नागवेकर हे सात जण राऊतवाडी धबधब्या जवळ असलेल्या क्षितिज होम स्टे येथे सकाळी 11 वाजता जेवणासाठी आले होते. दुपारी जेवण करून त्यातील तिघेजण चार वाजता पोहण्यासाठी धरणातील पाण्यात उतरले. विवेक नागवेकर हा पाण्यात खोलवर गेले असता पाण्याचा अंदाज न आल्याने विवेकचा मृत्यू झाला. त्याच्या मित्रांनी आरडाओरडा करून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. रात्रभर शोधकार्य सुरु होते. आज सकाळी 7 वाजता विवेकचा मृतदेह तरंगताना दिसला. मृतदेह बाहेर काढून सोळाकुर येथे तपासणी व शव विच्छेदन करून मृतदेह नातेवाईका कडे ताब्यात देण्यात आला. अधिक तपास राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदय डूबल यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णात यादव, के डी लोकरे , प्रविण गुरव हे करीत आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









