प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापुरातील राजाराम बंधारा येथे चालकाचा ताबा सुटल्याने चारचाकी वाहन पंचगंगा नदीत कोसळले. ही घटना आज (दि. ४) दुपारी ३. ३० च्या सुमरास घडली. येथील स्थानिक लोक मासे पकडण्यासाठी गेले असताना त्यांच्या समोरच ही दुर्घटना घडली. नदीतून गाडी वाहून जात असतानाच चालकाने चपळाईने दरवाजा उघडून बाहेर पडत आपला जीव वाचवला. परंतु, पाण्याच्या प्रवाहाला वेग असल्याने गाडी वाहून गेली.
दरम्यान, गाडी वाहून जात असताना स्थानिकांच्या मदतीने चालकाला नदी पात्रातून सुरक्षीत बाहेर काढण्यात आले आहे. चारचाकी वडणगे गावातून येत होती. या घटनेची माहिती मिळताच शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चालकास पोलिस ठाण्यात दाखल केले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









