प्रतिनिधी/कोल्हापूर
सरनोबतवाडी येथील राजाराम तलावात एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला. आज, बुधवार (दि.10) सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. सकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांना हा मृतदेह एका पिशवीत निदर्शनास आला. याची माहिती मिळताच राजारामपुरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्या महिलेची ओळख पटवण्याचे काम पोलिसांनी तातडीने सुरू केले आहे.
मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना आज सकाळी राजाराम तलाव येथे एका पिशवीत मृतदेहाचे अवशेष असल्याचे निदर्शनास आले. पिशवी बाहेर काढल्या नंतर त्यात एका महिलेचा अर्धवट मृतदेह पोलिसांना मिळून आला. या महिलेचा खून करून तिचा अर्धवट मृतदेह पाण्यात फेकून दिल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झाले. मृतदेहाचा पंचनामा करून ते शवविच्छेदनासाठी सीपीआरमध्ये पाठवण्यात आले आहे. ही महिला अंदाजे 60 वर्ष वयोगटातील असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम राजारामपुरी पोलिस ठाण्यात सुरू आहे.
Previous Articleदहावीच्या निकालातील घसरण भरून काढण्यासाठी प्रयत्न आवश्यक
Next Article शहरातील सांडपाणी ग्रामीण भागातील शेतात









