गोकुळ शिरगाव / वार्ताहर
गोकुळ शिरगाव तालुका करवीर येथे भुरट्या चोरांचा गावातील दुकानदारांना गेल्या वर्षभरापासून चांगलाच मनस्ताप होत आहे. गेल्या एक ते दीड वर्षापासून या गावांमध्ये सातत्याने भुरटे चोर प्रत्येक पंधरा दिवस ते महिन्याला एका रात्रीत दोन ते तीन दुकाने फोडून त्यामधला किरकोळ माल व रक्कम हडप करत आहेत. त्यामुळे इथल्या या भुरट्या चोरीच्या मनस्तापाला दुकानदारांना सामोरे जावे लागत आहे. .चोरी किरकोळ जरी करत असले तर प्रत्येक वेळी दुकानाचे कुलूप तोडणे दुकानाचे आतील नुकसान करणे व किरकोळ चोरी करत असल्याने याच्या विरोधात पोलिसांमध्ये चोरीचा गुन्हा दाखल करणे सुद्धा दुकानदारांना अवघड झाले आहे.
या सर्व चोरीच्या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी ग्रामपंचायत गोकुळ शिरगावने गावाच्या चारी बाजूंनी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत .त्यामुळे चोरी होणार नाही अशी दुकानदारांचा समज होता. पण चोरसुद्धा काही कमी नाहीत. चोरांनी सीसीटीव्हीचे वायरस कापून सरळ दुकानं फोडण्याची तयारी करत आहेत. या भुरट्या चोरांचा वेळीच गोकुळ शिरगाव पोलिसांनी बंदोबस्त करून ह्या भुरट्या चोरांपासून दुकानदारांना मनस्ताप होणार नाही अशी दक्षता पोलिसांनी घ्यावी. अशी चर्चा गोकुळ शिरगाव येथे राहत असलेल्या सर्व ग्रामस्थांची व दुकानदारांची होत आहे.









