प्रतिनिधी / वारणानगर
कोरोना विषाणू बाधीत रुग्णासाठी कोडोली ता.पन्हाळा येथील यशवंत हॉस्पिटल मार्फत समाजाच्या हिताच्या दृष्टीने सुरू केलेले कोव्हिड समर्पित रुग्णालय पन्हाळा तालुक्याला वरदान ठरणार असल्याचे गौरवउद्गार राज्याचे आरोग्य राज्यमंत्री ना. राजेद्र पाटील यानी यड्रावकर यानी रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी काढून शासना मार्फत व्हेंटिलेटर देण्याचे आश्वासन दिले.
जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांसाठी वैद्यकीय सेवा अपूरी पडू लागली आहे. यशवंत समूहाचे संस्थापक स्व. माजी आ. यशवंत ए. पाटील यांचा सामाजिक बांधिलकीचा वारसा जपत डॉ. जयंत पाटील यानी अत्यंत गरजेच्या वेळी हे रुगणालय सुरू करून शासनाला सहकार्य केलेबद्दल धन्यवाद देत या संस्थेचा इतर मेडिकल कॉलेज व मेडिकल क्षेत्रात काम करणाऱ्यांनी आदर्श घेवून असे कोरोना रूग्णालय उभे करावे. कोरोना टेस्टिंग वाढवून पन्हाळा तालुका कोरोना मुक्त करण्यासाठी पन्हाळा तालुक्यात सर्व आरोग्याच्या सर्व सुविधा युद्ध पातळीवर राबिवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पालकमंत्री व्हीसीद्वारे ……..
जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सतेज पाटील यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थिती दर्शवून उपलब्ध साधन सुविधेचा आढावा घेत सर्वोतोपरी मदतीचे आश्वासन देत सध्या मोठ्या प्रमाणात डॉक्टर व नर्सिंग स्टाफ कोरोना पॉझिटिव्ह येत असल्याचे दिसून येत असल्याने डॉक्टर व नर्सिंग स्टाफने स्वतः ची दक्षता घेण्याचा सूचना देवून अॅन्टीजेन टेस्टची सुविधा तसेच इतर अडचणी सोडवण्याचे आश्वासन दिले.
यावेळी संस्थेचे सचिव डॉ जयंत पाटील यांच्या हस्ते उपस्थितांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. मिलिंद गोडबोले यांनी केले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ योगेश साळे, पन्हाळ्याचे उपविभागीय अधिकारी अमित माळी तहसीलदार रमेश शेडगे, उप जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनिल अभिवंत, केखले प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.शंकर पाटील, रूग्णालयाचे समन्वयक डॉ. सूर्यकिरण वाघ, कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज बनसोडे, मंडल अधिकारी अभिजित पोवार, तलाठी अनिल पोवार, ग्रामविकास अधिकारी ए.वाय. कदम, कोडोलीसह काही गावातील कोरोना दक्षता समितीचे अध्यक्ष उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. अभिजित इंगवले यांनी केले.
कोडोली ता. पन्हाळा येथील यशवंत कोविड समर्पित रुग्णालयाचे उद्घाटन करताना राज्याचे आरोग्य राज्यमंत्री ना. राजेंद्र पाटील यड्रावकर, याप्रसंगी डॉ. जयंत पाटील,डॉ. मिलिंद गोडबोले,डॉ.सुर्यकिरण वाघ व इतर उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









