वार्ताहर / यड्राव
शिरोळ तालुक्यातील यड्राव येथे पूर्ववैमनस्यातून तरुणावर धारदार शस्त्राने खुनी हल्ला करण्यात आला. संदीप बाळू गदाळे वय 25 रा. गावठाण यड्राव असे जखमी तरुणाचे नाव आहे. या प्रकरणातील संशयित प्रकाश वीरभद्रे, विजय शिंदे, सागर आदमाने हे तिघे मारेकरी फरार आहेत संशयितांच्या शोधासाठी शहापूर पोलिस ठाण्याचे पथक रवाना करण्यात आले आहे. तर जखमीस इचलकरंजी येथील खासगी हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. ही घटना अल्फोंसा स्कूल समोरील मार्गावर सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. यातील संशयित मुख्य सूत्रधार हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत रात्री उशिरापर्यंत शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
संदीप गदाळे हा इलेक्ट्रिशियन वायरमनचे काम करतो. तो सायंकाळी पाचच्या सुमारास आपली मोटरसायकल स्प्लेंडर एम एच 09 बी डब्ल्यू 0411 यावरून अल्फोंसा स्कूल समोरील मार्गावरून घराकडे जात होता. त्यावेळी प्रकाश विरभद्रे, विजय शिंदे, सागर आदमाने या तिघांनी त्याला रस्त्यामध्ये गाठून त्याच्यावर धारदार शस्त्राने खांद्यावर खुनी हल्ला केला. नागरिकांची चाहूल लागताच मारेकरी घटनास्थळावरून पसार झाले. घटनास्थळी संदीप गदाळे व त्याची मोटर सायकल रस्त्यावरच पडली होती. रक्तबंबाळ शर्ट ही त्या ठिकाणी पडला होता. या खुनी हल्ल्याची माहिती त्याचे मित्र व नातेवाईकांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन रक्तबंबाळ संदीप याला घेऊन त्याला इचलकरंजी येथील खाजगी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले. खुनी हल्ल्याची माहिती मिळताच पोलीस पाटील जगदीश संकपाळ व शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश निकम हे आपल्या साथीदारांसह घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मारेकऱ्यांच्या मागावर एक पथक पाठवले आहे. तर हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमीची विचारपूस करून पंचनामा करण्याचे काम सुरू होते. याबाबत रात्री उशिरापर्यंत शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








