पालकमंत्री सतेज पाटील यांच्या सीपीआर, आयजीएम हॉस्पिटलमधील कोरोना आढावा बैठकीत सुचना
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिलहÎात कोरोनाच्या दुसऱया लाटेतही कोरोना मृत्यूदर सातत्याने वाढत आहे. तो नियंत्रणात आणणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व विभागाने काम करून मृत्यूदर कसा कमी करता येईल, याबाबत जबाबदारी उचलावी, अशी सुचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोरोना आढावा बैठकीत दिल्या. सीपीआर हॉस्पिटल आणि इचलकरंजीतील आयजीएम हॉस्पिटलमध्ये पालकमंत्री सतेज पाटील यांनी बुधवारी आढावा बैठका घेतल्या. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, प्रभारी अधिष्ठाता डॉ. सुधीर सरवदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे उपस्थित होते.
बैठकीत पालकमंत्री पाटील यांनी वर्षभरात चांगले काम झाले आहे. त्यामध्ये काही उणिवा राहात आहेत, त्या कमी करण्याची जबाबदारी घ्यावी लागेल. वैद्यकीय क्षेत्राकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कोरोनापूर्वी आणि कोरोनानंतर बाहÎरूग्ण, आंतररूग्ण किती आहेत, याचा विचार केल्यास आपण कुठे कमी पडतोय याचे चिंतन आवश्यक आहे. कोरोनापुर्वी अन्य रूग्णांच्या उपचाराचे नियोजन होते. पण सद्यस्थितीत कोरोना रूग्ण कमी असताना कुठे कमी पडतो, याबाबत, सर्वांनी दक्षता घ्यावी. मृत्यूदर रोखण्यासाठी सक्षमपणे पावले उचलावीत, अशा सुचना केल्या.
जिल्हाधिकारी देसाई यांनी एकही रूग्ण दगावणार नाही, असे ध्येय ठेवा. रूग्ण उपचार घेत असलेल्या वार्ड मधील वैद्यकीय स्टाफने रूग्ण बरा होऊन घरी जाईल, याची जबाबदारी घ्यावी. आपलेच नातेवाईक उपचार घेत आहेत, असे समजून काळजी घ्यावी, अशा सुचना केल्या.
ट्रेसिंग, टेस्टिंग, ट्रिंटमेंट त्रिसुत्रीवर भर द्या
ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रिंटमेंट या त्रिसुत्रानुसार अर्ली ट्रेसिंग आणि अर्ली ट्रिंटमेंटवर भर द्यावा, अशी सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली. पालकमंत्री पाटील यांनी इचलकरंजी येथील आय.जी.एम. रूग्णालयात आढावा बैठक घेतली. यावेळी आमदार प्रकाश आवाडे, जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. अनिल माळी, प्रांत डॉ. विकास खरात, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे, प्रभारी मुख्याधिकारी शरद पाटील, अतिरिक्त पोलिस प्रमुख जयश्री गायकवाड, उपअधीक्षक बी. बी. महामुनी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. रवींद्रकुमार शेटÎे उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील यांनी केअर सेंटर वाढवा, खासगी डॉक्टरांसोबत बैठक घेऊन त्यांना जबाबदारी द्यावी. संभाव्य रूग्णसंख्या लक्षात घेवून तयारी ठेवा व आवश्यक ते नियोजन करा, अशा सुचना दिल्या. तसेच जिल्हाधिकारी देसाई यांनी मृत्यूदर कमी होण्यासाठी डॉक्टरांनी विशेष दक्षता घ्यावी. सर्व नगरसेवकांना सक्रीय करावे. प्रभाग समित्या सक्रीय करावेत. लसीकरणाबाबत प्रशासनाने स्वतंत्र व्यवस्था करावी., अशी सुचना केली. पालकमंत्री व जिल्हाधिकाऱयांनी व्यंकटेश्वरा हायस्कूल मधील कोविड काळजी केंद्राला भेट देवून तेथील पाहणी करून सूचना दिल्या.
सीपीआरमधील स्थिती ः ऑक्सीजन बेड- 480, आयसीयू बेड-91, व्हेंटिलेटर-91, एकूण रूग्ण संख्या-212, व्हेंटिलेटरील रूग्ण-42, ऑक्सिजनवरील रूग्ण-179, नवीन रूग्ण-22, डिस्चार्ज-11, संशयित-25, डॉक्टरा 178, नर्सिंग स्टाफ-414,
आय.जी.एम.मधील स्थिती ः ऑक्सीजन बेड- 200, आयसीयू बेड-10, व्हेंटिलेटर-28, एकूण रूग्ण संख्या-227, एनआयव्ही रूग्ण-3, ऑक्सीजनवरील रूग्ण-77, नवीन रूग्ण-23, डिस्चार्ज-26, संशयित-28, डॉक्टर्स 27, नर्सिंग स्टाफ-54,









