राजनंदिनी यादव हिचा अपघातात झाला होता मृत्यू
मिणचे खुर्द /वार्ताहर
म्हसवे (ता. भुदरगड) येथील अजित यादव व कुटुंबीयांनी मुलगी ‘राजनंदिनी’ च्या वर्षश्राध्दाला वड वृक्षांच्या रोपांचे वाटप करून मुलगीच्या आठवणीला उजाळा दिला.
मुलीच्या पहिल्या वर्षश्राध्दास वडाच्या रोपट्याची अनोखी भेट देऊन मुलीच्या दुःखावर फुकर घातली. कोरोना महामारीत रुग्णांना सर्वत्र ऑक्सिजनची कमतरता भासत होती. याच कारणातून ऑक्सिजन देणारे वडाच्या वृक्षांची सर्वत्र लागवड करणे गरजेचे आहे. निसर्गाचा समतोल व पर्यावरणाचे रक्षण यासाठी झाडांचे वृक्षारोपन होणे गरजेचे आहे या जाणिवेतून अजित व अनुजा यादव यांनी वडाच्या रोपांचे वाटप केले.
‘राजनंदिनी’ हिचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या गोष्टीला एक वर्ष पूर्ण होतेय. गतवर्षी दीपावली दरम्यान ‘राजनंदिनी’ कायमची सोडून गेली. रोपाच्या रुपाने आपल्या लाडक्या मुलीची स्मृती चिरंतन स्मरणात राहावी यासाठी रोपांचे वृक्षारोपण व्हावे या उदात्त हेतूने उपक्रम राबवला. वडाची रोपे जगविणाऱ्यांचा पुढच्या दीपावलीत आहेर करण्यात येणार आहे. यादव कुटुंबियांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









