वार्ताहर/मुरगूड
मुरगूड परिसरात कोरोनाने कहर केला आहे. शहरात आज ९ पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने रुग्णसंख्या ९८ वर पोहचली. तर, शहरालगतच्या निढोरीत ५ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने गाव तीन दिवस लॉकडाऊन केले आहे. शुक्रवार दि. २८ ते ३० अखेर तीन दिवस लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. शिंदेवाडीत दोघे तर चिमगावात एक जणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
निढोरी ता. कागल येथे मयत पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. ६७ वर्षीय इसमाचा मंगळवारी मृत्यू झाला. त्याच्या प्रथम संपर्कातील स्वॅब घेतलेल्यांपैकी रुग्णाच्या घरातील चौघांसह आणखी एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. गेल्या साडेपाच महिन्यात नसलेल्या कोरोनाने धडकी भरणारी एंट्री त्यामुळे नागरिकांत घबराट पसरली आहे. यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने नागरिकांना मास्क वापरण्याचे व सोशल डिस्टन्स राखून दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान मुरगूडात आज ९ जण पॉझिटिव्ह झाल्याने रुग्णांचा शतकाकडे चाललेला आकडा ९८ वर पोचला आहे. त्यामध्ये देशमुखनगरमधील ५२ वर्षीय महिला, गावभाग चौगले गल्लीतील १३ वर्षांच्या मुलगा व एक ५२ व ४५ वर्षीय दापत्य, सरपिराजी रोडवरील ३९ व ६५ वर्षाच्या दोघी महिला, ५९ वर्षांची बसस्थानकाजवळील महिला आणि २९ वर्षाचा साळोखे गल्लीतील युवक यांचा समावेश आहे. कोरोनाने शहरातील ८ बळी घेतले असून ९८ ६८ रुग्ण उपचारांती बरे झाले आहेत तर २२ जणांवर उपचार सुरू आहेत. शिंदेवाडीतील ५२ वर्षाची माहिला आणि ३२ वर्षाचा पुरुष तर चिमगावात ३१ वर्षाचा पुरुष यांचीही पॉझिटिव्ह रुग्णामध्ये भर पडली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









